चिंचवड आणि रावेत येथे चोरट्याने पळवला सव्वापाच लाखांचा ऐवज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 07:56 PM2020-03-03T19:56:07+5:302020-03-03T19:57:06+5:30
दोन्हीही घटनांमध्ये घराचा दरवाजा होता उघडा
पिंपरी : चिंचवड आणि रावेत येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये उघड्या दरवाजावाटे घरात घुसून चोरट्यांनी घरातून पाच लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास चिंचवड आणि रावेत येथे घडली आहे.
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज सीताराम भोईर (वय ३६, रा. केशवनगर, काळेवाडी लिंक रोड, चिंचवड) यांनीफिर्याद दिली आहे. भोईर यांचे सेजल पार्कजवळ दोन मजली घर आहे. घरातील सर्व माणसे वरच्या मजल्यावर असताना खालच्या मजल्याचा मागील दरवाजा उघडा होता. त्या दरवाजातून चोरटे आत घुसले. खालील मजल्यावर मधल्या खोलीत असलेले लोखंडी कपाट चावीने उघडून पाच लाख रुपयांचे २५ तोळ्यांचे दागिने चोरून नेले.
रावेत येथे सिलेस्टीयल सिटी पेष्ठज एक येथे सोमवारी पहाटे दीड ते सकाळी आठ या कालावधीत उघड्या दरवाजावाटे चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. रिषभ ओमप्रकाश जोशी (वय १९, रा. रावेत, मूळ - परभणी) यांनी देहूरोड पोलीसात फिर्याद दिली आहे. सोमवारी मध्यरात्री दीड वाजता जोशी यांचा मित्र घरी येणार असल्याने त्यांनी रूमचा दरवाजा लॉक न करता पुढे ढकलला आणि झोपी गेले. रात्री चोरट्यांनी रूममधून महागडा मोबाईल आणि एअरफोन असा ३७ हजारांचा ऐवज चोरून नेला.