पिंपरी शहरात वाहनचोरटे सुसाट; सहा वाहनांची चोरी; गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 09:36 PM2021-06-23T21:36:17+5:302021-06-23T21:36:38+5:30
याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २२) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
पिंपरी : शहरात चोरटे सुसाट आहेत. भरदिवसा वाहने चोरीला जाण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. चोरट्यांनी शहरातून सहा वाहने चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २२) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
अशोक रंगनाथ भोसले (वय ३३, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने त्यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी चाकण येथील श्रध्दा हॉस्पिटल समोरील पार्किंगमध्ये पार्क केली होती. चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार सोमवारी (दि. २१) दुपारी एक ते दीडच्या दरम्यान घडली.
सखाराम रावसाहेब कांबळे (वय ३४, रा. बालाजीनगर, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी मेदनकरवाडी गावाच्या हद्दीत बालाजीनगर येथे पार्क केली होती. चोरट्यांनी ती दुचाकी चाेरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार सोमवारी (दि. २१) सायंकाळी पाच ते मंगळवारी (दि. २२) सकाळी आठच्या दरम्यान घडला.
रवींद्र शिवाजी शेळके (वय २३, रा. ताम्हाणे वस्ती) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची ४० हजार रुपये किमतीची राहत्या घराच्या समोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार शनिवारी (दि. १९) रात्री आठ ते रविवारी सकाळी आठच्या दरम्यान घडला.
सिद्धाराम रेवप्पा शिवशरण (वय ३७, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने त्यांची १० हजार रुपये किमतीची दुचाकी घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार १४ जून रोजी रात्री साडेदहा ते १५ जून रोजी सकाळी सातच्या दरम्यान घडली.
कार्तिक नंदू स्वामी (वय १९, रा. कैलासनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने त्यांची ६० हजार रुपये किमतीची दुचाकी कोकणे चौक, रहाटणी येथे पार्क केली होती. चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहनचोरीचा हा प्रकार रविवारी (दि. २०) रात्री सव्वाआठ ते साडेआठच्या दरम्यान घडला.
चारचाकी वाहनाचा सायलेन्सर चोरी
चाकण परिसरातील नाणेकरवाडी येथे चोरट्यांनी चारचाकी वाहनाच्या २० हजार रुपये किमतीचा सायलेन्सर चोरून नेला. चोरीचा हा प्रकार १७ जून रोजी सायंकाळी पाच ते १८ जून रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली. किशोर बाजीराव लगड (वय ३१, रा. नाणेकरवाडी) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाहनचोरीचा आणखी एक प्रकार कुरुळी (ता. खेड) येथे सोमवारी (दि. २१) दुपारी साडेबारा ते तीनच्या दरम्यान घडला. याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीची २० हजारांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली.