तरुणीला सव्वा लाखाचा गंडा : डेबिट कार्ड चोरून ट्रान्झेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 08:04 PM2019-07-12T20:04:48+5:302019-07-12T20:12:20+5:30
इव्हेंट को ओर्डीनेटरने विश्वास संपादन करून तरुणीचे दागिने, किमती साहित्य तसेच मोबाईल फोन व डेबीट कार्ड चोरून नेले. चोरी केलेल्या डेबीट कार्डव्दारे ८० हजारांचे ट्रान्झेक्शन केले.
पिंपरी : इव्हेंट को ओर्डीनेटरने विश्वास संपादन करून तरुणीचे दागिने, किमती साहित्य तसेच मोबाईल फोन व डेबीट कार्ड चोरून नेले. चोरी केलेल्या डेबीट कार्डव्दारे ८० हजारांचे ट्रान्झेक्शन केले. एकूण १ लाख ३१ हजार ७०० रुपयांचा ऐवज आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुलसिंग प्रतापसिंग (रा. चंदिगड) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तापसी अनुप टंडन (वय २५, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई, मुळपत्ता फिलखाना, कानपूरनगर, कानपूर, उत्तरप्रदेश) यांनी फिर्यादी दिली आहे. फिर्यादी तापसी टंडन नोकरी करतात. तर आरोपी राहुलसिंग प्रतापसिंग फेसबुक इव्हेंट ओर्डीनेटर आहे. आरोपी राहुलसिंग याने फिर्यादी टंडन यांचा विश्वास संपादन केला. हिंजवडी येथील लक्ष्मी चौकातील एका हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. त्यावेळी आरोपी राहुलसिंग याने फिर्यादी यांचे किमती दागिने व किमती साहित्य तसेच मोबाईल फोन असे ५१ हजार ७०० रुपयांचे साहित्य चोरी केले. तसेच फिर्यादी टंडन यांचे डेबिट कार्डही चोरून नेले. या डेबिट कार्डव्दारे ८० हजारांचे ट्रान्झेक्शन केले. एकूण १ लाख ३१ हजार ७०० रुपयांचा ऐवज आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.