पारदर्शी कारभाराचं आश्वासन देत भाजपने सत्ता मिळविली; ५ वर्षांत ९ लाचखोरी प्रकरणं उघड झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 09:58 PM2021-08-18T21:58:20+5:302021-08-18T21:59:36+5:30
भाजपच्या राजवटीत आजपर्यंत नऊ प्रकरणे घडली असून १२ जणांना लाच घेताना पकडले आहे.
पिंपरी: भय आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे आश्वासन देऊन महापालिकेत भाजपने सत्ता मिळविली. गेल्या साडेचार वर्षांत लाच खोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. तसेच भाजपच्या राजवटीत आजपर्यंत नऊ प्रकरणे घडली असून १२ जणांना लाच घेताना पकडले आहे. तर पारदर्शक कारभाराचे अमिष दाखविणाऱ्या महापालिकेत लाचखोरी रोखणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका ही श्रीमंत महापालिका असून विविध विकासकामांसाठी सत्ताधारी आणि प्रशासन टक्केवारी घेतात. हे उघड गुपीत आहे. महापालिकेत पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. आता भाजपची आहे.
भय आणि भ्रष्टाचारमुक्तीचे आश्वासन देऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने सत्ता मिळविली. तेव्हापासून नऊ प्रकरणे घडली आहेत. महापालिकेत सत्ता येताच पहिल्याच महिन्यात आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या स्विय्य सहायकाने बारा लाखांची लाख लाच घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर गेल्या पावणेचार वर्षांत सत्ताधारी भाजपवर निविदांत रिंग होत असल्याचा आरोप केला जात आहे. तर गेल्या पावणेचार वर्र्षांत महापालिकेतील आरोग्य, शिक्षण लेखा आणि नगरसचिव विभागातील बारा जणांना अटक झाली आहे. २०२१ मध्ये स्थायी समिती अध्यक्षाच्या स्विय्य सहायकास ताब्यात घेतले आहे.
..........................
गेल्या पाच वर्षांत बारा जण एसीबीच्या जाळ्यात अडकले
गेल्या पंधरा महापालिकेत २७ प्रकरणे उघडकीस आली आहेत. भाजपची सत्ता आल्यापासून नऊ प्रकरणे लाचखोरीची उघडकीस आली त्यात बारा जण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. २०१७ मध्ये आयुक्तांचे स्वीय सहायक, महापालिकेचे मुख्याध्यापक, सहायक आरोग्य अधिकारी, लेखाधिकारी, आरोग्य कर्मचारी यांना लाच स्विकारल्याप्रकरणी अटक केली होती.