कलाक्षेत्रात मेहनतीला पर्याय नाही, अजूनही मी शिकतेचं आहे - प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 09:20 PM2024-08-09T21:20:59+5:302024-08-09T21:21:19+5:30

आजकाल भूमिका मिळविणासाठी काही करायला मुली तयार असतात. मग त्रासही सहन करण्याची तयारी ठेवायला हवी. एखाद्या भूमिकेस नाही म्हणण्याची ताकद आपल्यात यायला हवी असंही त्यांनी सांगितले.

There is no substitute for hard work in the field of art, I still want to learn - famous actress Rohini Hattangadi  | कलाक्षेत्रात मेहनतीला पर्याय नाही, अजूनही मी शिकतेचं आहे - प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी 

कलाक्षेत्रात मेहनतीला पर्याय नाही, अजूनही मी शिकतेचं आहे - प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी 

विश्वास मोरे 

पिंपरी : भूमिकेशी समरस होऊन काम करायला हवे. आपली प्रतिष्ठा आपणच जपायला हवी. क्षेत्र कोणतेही असो,  मेहनतीला पर्याय नाही. त्यामुळे कला क्षेत्रात नवीन प्रवाह, बदल आजमावत रहावे, शिकत राहावं, मीही अजून शिकतच आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आज चिंचवड येथे व्यक्त केले. 

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी- चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध अभिनेते अजित भुरे यांच्या हस्ते हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले. पन्नास हजार रोख, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. त्यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापासून तर कला क्षेत्रातील वाटचाल, चित्रपट, नाट्य माध्यमात झालेला बदल यावर मत व्यक्त केले. 

यावेळी अध्यक्ष भाऊसाहेब भोईर उपस्थित होते. याबरोबरच कलावंत मधु जोशी, निवेदक श्रीकांत चौगुले, अभिनेता पंकज चव्हाण, अभिनेत्री कोमल शिरभाते, लावणी नृत्यांगना आशारुपा परभणीकर व नाट्यकर्मी नटराज जगताप यांना पुरस्कार देण्यात आला. 

कामे मागायला जाणे हा माझा स्वभाव नव्हता

रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, '' आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवायचे आहे. त्याचा सातत्याने अभ्यास करणे,  शिकत राहणे महत्त्वाचे आहे. आपले क्षितिज गाठण्यासाठी आपण नेहमी अभ्यासूवृत्ती,  झोकुन देऊन काम करायला हवे.  काहीही झाले तरी मेहनतीला पर्याय नाही. मी  वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कलाक्षेत्रात कार्यरत आहे.  सुरुवातीला नृत्य आणि पुढे नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा या संस्थेत मला खूप शिकायला मिळाले. पुढे नाट्य क्षेत्रात, चित्रपट या माध्यमात काम केले. चांगुणा, सारांश, गांधी अशा विविध कलाकृतींमधून काम केले.  वाटचालीत आईची भूमिका करणारी ही बाई, अशी ओळख पुसायला खूप कालखंड गेला. कामे मागायला जाणे हा माझा स्वभाव नव्हता. काम मागायला गेले तर माझ्याकडे नाही म्हणण्याचा चॉईस नसेल. आजकाल भूमिका मिळविणासाठी काही करायला मुली तयार असतात. मग त्रासही सहन करण्याची तयारी ठेवायला हवी. एखाद्या भूमिकेस नाही म्हणण्याची ताकद आपल्यात यायला हवी.'' 

आपली प्रतिष्ठा जपा.   

''इतर माध्यमे आल्याने नाटक आणि चित्रपट माध्यमात बदल झाले आहेत. त्यामुळे सतत शिकत राहिले पाहिजे. ज्या भूमिका मिळाल्या. त्यांना न्याय देण्याचे काम केले. मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीपेक्षा तेलगू चित्रपट सृष्टीचे काम अधिक नियोजनबद्ध असते, असे जाणवले. आपण नेहमी आपली प्रतिष्ठा जपायला हवी, असही कानमंत्र हट्टंगडी यांनी दिला. 

जीवनगौरव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात डावीकडून नटराज जगताप, पंकज चव्हाण, श्रीकांत चौगुले, मधु जोशी, अजित भुरे, रोहिणी हट्टंगडी,  आशारूपा परभणीकर, भाऊसाहेब भोईर, कोमल शिरभाते.

Web Title: There is no substitute for hard work in the field of art, I still want to learn - famous actress Rohini Hattangadi 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.