आली लगीन घटिका, कार्यालयासाठी धावपळ
By admin | Published: November 23, 2014 12:21 AM2014-11-23T00:21:39+5:302014-11-23T00:23:44+5:30
तुलसी विवाहानंतर मंगल कार्यालये बुक करण्यासाठी वधू-वरांच्या कुटुंबियांची धावपळ सुरू झाली आहे. 26 नोव्हेंबर पासून विवाहाचे मुहूर्त सुरू होत आहेत.
Next
सुवर्णा नवले - पिंपरी
तुलसी विवाहानंतर मंगल कार्यालये बुक करण्यासाठी वधू-वरांच्या कुटुंबियांची धावपळ सुरू झाली आहे. 26 नोव्हेंबर पासून विवाहाचे मुहूर्त सुरू होत आहेत.
काही प्रतिष्ठीत किंवा पैशावाल्या मंडळीचा शहरातील नामवंत कार्यालये बुक करण्याकडे कल असतो. लग्न थाटामाटातच करण्याचा काही कुटुंबाचा प्रयत्न असतो. त्यामुळे मंगल कार्यालयाच्या भाडय़ाचा ते विचार न करता बुकींग करुन टाकतात. मात्र, सर्वसामान्य आवाक्यातील कार्यालयाचा शोध घेत बुकींग करीत आहेत.
अगदी छोटय़ा हॉलपासून ते मोठमोठय़ा कार्यालये आणि लॉन्सना मागणी वाढली आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी या महत्त्वाच्या ठिकाणी कार्यालये नोंदणी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात विचारणा होत आहे. चिंचवड परिसरात सर्वात जास्त मंगल कार्यालये आहेत. रावेत, वाकड, ताथवडे, हिंजवडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, रहाटणी, दापोडी, काळेवाडी , चिखली, थेरगांव, आदी ठिकाणीही अनेक कार्यालये आहेत. बहुतेक कार्यालयांची नोंदणी जोरात सुरु आहे. ठराविक कार्यालयात तारखा शिल्लक नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
रावेत, वाकड, भोसरी, थेरगांव, चिंचवड, निगडी परिसरातील कार्यालयाचे बुकीग करण्यात येत आहे. देहू व आळंदी या तीर्थक्षेत्री मोठय़ा प्रमाणावर विवाह केले जात आहेत. तेथील धर्मशाळा किंवा कार्यालय दिवसात दोन विवाहासाठी आरक्षित केले जात आहे. सकाळी व संध्याकाळच्या मुहूर्तासाठी नोंदणी करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना देहू व आळंदीत विवाह करणो सोईस्कर वाटते. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे तिकडेच धाव घेतात. काही धर्मशाळा, कार्यालयांचे भाडे 1क् ते 12 हजार रुपये इतके सामान्यांना परवडणारे आहे. शिवाय तेथे विवाहासाठीची सर्व तयारी करून मिळते. सामूहिक विवाहातही वाढ झाली आहे. आळंदी व देहू तसेच शहरातील काही संस्था, सामाजिक कार्यकर्ते सामू¨ंहक विवाहासाठी पुढाकार घेतात.
4लग्नसराई सुरू झाली आहे. शहरातील लग्न कार्यालयांची आगाऊ नोंदणी वधू व वरांच्या कुटुंबियांनी सुरू केली आहे. यामुळे लग्नाच्या 3 महिन्याच्या हंगामात कार्यालयाना चांगलाच वाव मिळतो.
4हा तीन महिन्याच्या हंगाम कार्यालय मालकांसाठी सुगीचा असतो. यामुळे लग्नाची कार्यालयाच्या तिथी वाया जाऊ नयेत याची ते काळजी घेतात.
कार्यालये करण्यासाठी नोव्हेंबरमध्ये गर्दी वाढू लागली आहे. लग्नाचे मुहूर्तही मोठय़ा प्रमाणावर आहेत. यामुळे आतापासूनच आगाऊ नोंदणी करण्यासाठी नागरिक येत आहेत.
किशोर निंबाळकर, कार्यालय मालक, ताथवडे
आतार्पयत कार्यालयाचे 12 ते 15 बुकींग झाले आहेत. अजून मोठय़ा प्रमाणावर बुकींग होण्याची अपेक्षा आहे. मात्र लग्नसराई सुरू झाल्यामुळे आता कार्यालयांना मागणी वाढली आहे.
- बाळासाहेब बेंद्रे, कार्यालय मालक, हिंजवडी
4डिसेंबरमधील मुहूर्त
दि. 2क् : सायं. 5.29.
दि. 23 : सायं. 4:3क्.
दि. 24 : सायं. 4:3क्.
दि. 26 : सायं. 6:17.
दि. 28 : दुपारी 3:24
दि. 29 : सायं 6:17.
4जानेवारीतील मुहूर्त
दि. क्2 : सायं. 4:49, 7:45.
दि. क्4 : सायं. 3:5क्.
दि. क्9 : सायं. 5:45, 7:45.
दि. 1क् : दुपारी 3:27, 5:41.
4फेब्रुवारीमधील मुहूर्त
दि. 1 : सायं. 4:2क्, 6:56.
दि. 3 : सायं. 5:37.
दि. 7 : सायं. 5:3क्.
दि. 12 : सायं. 6:13.
दि. 15 : सायं. 4:51.
दि. 17 : सायं. 5:53.
दि. 18 : सायं. 4:53, 7:3क्.
दि. 24 : सायं. 4.57.
दि. 26 : सायं. 4.57.