थेरगावमध्ये स्वयंघोषित भाईचा टोळक्यासह राडा; कोयत्याने वार करून दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 03:19 PM2022-02-15T15:19:22+5:302022-02-15T15:24:45+5:30

थेरगाव येथील घटना : कोयत्याने वार करून दहशत...

thergaon crime news rickshaw driver was beaten by gang pimpri | थेरगावमध्ये स्वयंघोषित भाईचा टोळक्यासह राडा; कोयत्याने वार करून दहशत

थेरगावमध्ये स्वयंघोषित भाईचा टोळक्यासह राडा; कोयत्याने वार करून दहशत

googlenewsNext

पिंपरी : स्वयंघोषित भाईने टोळक्यासह राडा घालत झाडाच्या कुंड्यांची तोडफोड केली. तसेच कोयत्याने वार करून एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ करून दहशत निर्माण केली. तुळजाई कॉलनी, थेरगाव येथे रविवारी (दि. १३) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. 

शामसुंदर श्रीनाथ यादव (वय ५२, रा. तुळजाई कॉलनी, थेरगाव) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. १४) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मयूर घोलप, शुभम चौधरी, आदित्य चव्हाण, अजय कांबळे, प्रणव शेवाळे, सोन्या साबळे व त्यांचे इतर अनोळखी ५ ते ६ मित्र यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील आरोपी शुभम चौधरी व आदित्य चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत. ते त्यांच्या घराच्या बाहेर बसलेले असताना आरोपी दुचाकींवरून फिर्यादीच्या कॉलनीमध्ये आले. कोयता हवेमध्ये फिरवून आरोपींनी दहशत निर्माण केली. फिर्यादीचा मुलगा अतुल कोठे राहत आहे, असे आरोपींनी विचारले. काय झाले, असे फिर्यादीने आरोपींना विचारले. मी मयूर घोलप असून पिंपरी -चिंचवडचा भाई आहे, अतुल कोठे आहे, मी त्याला जिवंत सोडणार नाही, असे आरोपी मयूर घोलप म्हणाला. त्यानंतर त्याने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात मारण्यासाठी वार केला. मात्र फिर्यादीने वार चुकवला. त्यामुळे कोयत्याचा तो वार फिर्यादीच्या घराच्या दरवाज्यावर बसला.

इतर आरोपींनी लाकडी दांडक्याने व हाताने लाथाबुक्‍यांनी फिर्यादीला मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या घरातील इतर लोकांना शिवीगाळ केली. घराच्या बाहेरील झाडाच्या कुंड्यांची तोडफोड केली. पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल तपास करीत आहेत.

Web Title: thergaon crime news rickshaw driver was beaten by gang pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.