कुलूप तोडून ते चोरी करणार इतक्यात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 20:22 IST2020-01-01T20:13:16+5:302020-01-01T20:22:11+5:30
फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

कुलूप तोडून ते चोरी करणार इतक्यात...
पिंपरी :फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. जुनी सांगवी येथे ही घटना घडली आहे.
सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन श्रीहरी गुजर (वय २७, रा. शितोळे नगर, जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अलंकार प्रेम कांबळे (वय २३, रा. इंदिरानगर वसाहत, खडकी), विशाल बब्बा राजोडीया (वय १९, रा. खडकी स्टेशन रोड, खडकी) अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी दुपारी एक वाजता सचिन हे फ्लॅॅटला कुलूप लावून मेसमध्ये जेवण्यासाठी गेले. त्यावेळी दोन्ही आरोपींनी सायकलच्या लोखंडी स्टॅन्डच्या सहाय्याने सचिन यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्नात असतानाच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
अडीच लाखांचे दागिने चोरीला
सराफाच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आतील अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. आळंदी रोड, भोसरी येथे ही शनिवारी ही घटना उघडकीस आली. भोसरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद दिनकर माळवे (वय २९, रा. आळंदी रोड, वडमुखवाडी, चरहोली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. माळवे यांचे आळंदी रोड, भोसरी येथे अनुष्का ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुकान बंद करून माळवे घरी गेले होते. त्याच रात्री चोरट्यांनी कशाच्या तरी साह्याने बंद दुकानाचे शटर उचकटले. त्यानंतर आतमध्ये प्रवेश करून दुकानातील २ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.