पोलीस असल्याची सांगून दोघांना लुटले ; पिंपरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 06:49 PM2019-12-01T18:49:48+5:302019-12-01T18:51:04+5:30

नशा करता का अशी विचारणा करत पाेलीस असल्याचे सांगून दाेघांना लुटल्याची घटना पिंपरीतील शाहूनगर येथे घडली.

They were robbed, claiming to be police | पोलीस असल्याची सांगून दोघांना लुटले ; पिंपरीतील घटना

पोलीस असल्याची सांगून दोघांना लुटले ; पिंपरीतील घटना

Next

पिंपरी : तुम गांजा पिते हो क्या, तुम नशा करते हो क्या, असे म्हणून तरूणांच्या हातांचा वास घेतला. ‘मै पोलीसवाला हू, तुम्हारे जेब मे जो है ओ बाहर निकालो, मुझे चेक करणेका है,’ असे म्हणून तरूणाला थोबाडीत मारून त्याच्या आणि मित्राकडील तीन मोबाईल, रोकड असा ५२ हजारांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. ही घटना शाहूनगर येथे गुरूवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडली.

चिखली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महमद नासमुल अहमद लष्कर (वय १८, रा कुदळवाडी, चिखली) याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरूवारी फिर्यादी महमद आणि त्याचा मित्र शाहूनगरकडे जात होते. यावेळी विरूद्ध दिशेने पिवळ्या ज्युपिटरवर आलेल्या आरोपीने फियार्दीला अडविले.  तुम गांजा पिते हो क्या, तुम नशा करते हो क्या असे म्हणून तरूणांच्या हातांचा वास घेतला. मै पोलीसवाला हू, तुम्हारे जेब मे जो है ओ बाहर निकालो, मुझे चेक करने का है, असे म्हणून तरूणाला थोबाडीत मारून त्याच्या आणि मित्राकडील तीन मोबाईल, रोकड असा ५२ हजार ३०० रूपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला. घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास तुमच्याकडे पाहून घेऊन अशी धमकी देऊन पिस्तूल दाखविले.

Web Title: They were robbed, claiming to be police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.