सोनसाखळी चोरटा जेरबंद : चोरीचे अकरा गुन्हे उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:08 AM2018-07-10T02:08:24+5:302018-07-10T02:08:36+5:30

महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारा चोरटा सोमवारी भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या गळाला लागला. त्याच्याकडून तब्बल ६ लाख ४३ हजार ५०० रुपये किमतीचे १५९.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

thief Arrested : eleven offenses of theft exposed | सोनसाखळी चोरटा जेरबंद : चोरीचे अकरा गुन्हे उघडकीस

सोनसाखळी चोरटा जेरबंद : चोरीचे अकरा गुन्हे उघडकीस

Next

पिंपरी : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारा चोरटा सोमवारी भोसरी एमआयडीसी पोलिसांच्या गळाला लागला. त्याच्याकडून तब्बल ६ लाख ४३ हजार ५०० रुपये किमतीचे १५९.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे एकूण ११ गुन्हे उघडकीस आले आहेत. सचिन तुकाराम राजगुरू (वय २७, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी ५ जुलैला एक महिला रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथके तैनात केली. तपासपथकांनी सापळा रचून सचिन याला पकडले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने सहा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. यामुळे भोसरी एमआयडीसी, चाकण आणि निगडी पोलीस ठाण्यातील ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सचिन वेल्डिंगचे काम करीत होता. त्याचे लग्नानंतर चाकण येथील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तो कामावर गैरहजर राहू लागला.त्याला कामावरून कमी केले. त्यामुळे त्याची पत्नी त्याला त्याला सोडून गेली. पर्यायाने तो चाकण येथील महिलेकडे जाऊ लागला. नोकरी गेल्याने खर्चाला पैसे कमी पडू लागले. त्यामुळे त्याने चोरीचा मार्ग निवडला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी तसेच निर्जनस्थळी चोरटे सोनसाखळ्यांवर डल्ला मारतात. या घटनांमध्ये अनेकदा महिला जखमीही होतात. या घटना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे.

Web Title: thief Arrested : eleven offenses of theft exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.