‘शहरीकरणास आव्हान न समजता संधी समजा’ - रणजित पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 03:22 AM2017-12-01T03:22:41+5:302017-12-01T03:23:08+5:30
वाढते नागरीकरण हे प्रगतीचे द्योतक असून, शहरीकरणास आव्हान न समजता संधी समजावे. तळेगावचा विकास करताना राजकारणास फाटा देत कोट्यवधी रुपयांची बचत केली असली, तरी चांगली आस्थापना असल्याशिवाय
तळेगाव दाभाडे : वाढते नागरीकरण हे प्रगतीचे द्योतक असून, शहरीकरणास आव्हान न समजता संधी समजावे. तळेगावचा विकास करताना राजकारणास फाटा देत कोट्यवधी रुपयांची बचत केली असली, तरी चांगली आस्थापना असल्याशिवाय विकास करणे शक्य नाही. त्यासाठी नगरपालिकेतील रिक्त ४५ जागांसह प्रलंबित विकासकामांना लवकर मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात आमदार बाळा भेगडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांची बैठक घेतली जाईल, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास व गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. त्यांच्या हस्ते शहरातील सुमारे ३० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन झाले. त्या वेळी झालेल्या समारंभात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबर भेगडे होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, पक्षप्रतोद सुशील सैंदाणे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शहर भाजपाचे अध्यक्ष संतोष दाभाडे-पाटील, जनसेवा विकास समितीचे संस्थापक बाळासाहेब काकडे, निमंत्रक चंद्रभान खळदे, ज्येष्ठ नगरसेविका सुलोचना आवारे, उद्योजक किशोर आवारे, नगरसेवक अरुण भेगडे-पाटील, गणेश खांडगे, अमोल शेटे, किशोर भेगडे, संग्राम काकडे, नीता काळोखे, मुख्याधिकारी वैभव आवारे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर, गणेश भेगडे, रवींद्र आवारे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार बाळा भेगडे म्हणाले,‘‘राज्यातील पहिली ग्रीनसिटी करण्याचा मान केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान यांनी तळेगावला दिला आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची तळेगावला दत्तक घेण्याची अपूर्ण राहिलेली इच्छा राज्यमंत्री रणजित पाटील यांनी पूर्ण करावी. प्रास्ताविक उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी केले. बांधकाम समितीचे सभापती अरुण भेगडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन शिक्षण समिती सभापती संग्राम काकडे यांनी केले. (वा. प्र.)
वतननगरजवळील रेल्वे अंडरग्राउंड बायपासच्या भूमिपूजनासह जिजामाता चौकातील व्यापारी संकुलाचे भूमिपूजन, एक्स्प्रेस फीडरचे लोकार्पण, भुयारी गटर, तसेच कचरा डेपो रस्ता आणि एलईडी दिव्यांच्या कामाचा शुभारंभ राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.