शिवरायांचे विचार आचरणात आणावेत : घोणे

By admin | Published: February 20, 2017 02:22 AM2017-02-20T02:22:32+5:302017-02-20T02:22:32+5:30

छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांची जयंती घराघरांत साजरी व्हावी तसेच जिजाऊंचे संस्कार, संत तुकोबारायांचे

Think of Shivaji's thoughts: Ghone | शिवरायांचे विचार आचरणात आणावेत : घोणे

शिवरायांचे विचार आचरणात आणावेत : घोणे

Next

जेजुरी : छत्रपती शिवरायांनी रयतेचे राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांची जयंती घराघरांत साजरी व्हावी तसेच जिजाऊंचे संस्कार, संत तुकोबारायांचे आचरण व शिवरायांचे विचार घराघरांत व मनामनांत रुजविण्याची गरज या युगात आहे, असे मत श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप घोणे यांनी व्यक्त केले.
जुनी जेजुरी येथील बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जेजुरी पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, नगरसेवक जयदीप बारभाई, गणेश शिंदे, अरुण बारभाई, नगरसेविका अमिना पानसरे, सविता जगताप, हेमंत सोनवणे, एन. डी. जगताप, पांडुरंग सोनवणे, राजेश पाटील, हरीश चामे, सर्जेराव कदम, अजयसिंह सावंत, दशरथतात्या जगताप उपस्थित्ज्ञोते. संत सोपानकाका वारकरी भागवत संप्रदाय जेजुरी-मोरगाव व परिसर तसेच स्थानिक महिलांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त पाळणा सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. वारकरी संप्रदाय क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल जयवंत जगताप यांना वारकरी गौरव पुरस्कार, सहकार-शिक्षण व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री बल्लाळेश्वर दूध संस्थेचे चेअरमन तानाजी जगताप यांना सहकाररत्न पुरस्कार, जिजाऊ ज्ञानमंदिराच्या शिक्षिका कोमल चौगुले यांना शिक्षकरत्न पुरस्कार व क्रीडा क्षेत्रातील सिद्धार्थ शिंदे यांना क्रीडारत्न पुरस्काराने गौरविले.
नगराध्यक्षा वीणा सोनावणे, नगरसेवक जयदीप बारभाई यांनी या वेळी मार्गदर्शन केले. शिवाजीमहाराज जयंती साजरी झाल्यानंतर जिजाऊ ज्ञान मंदिरातील लहान मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून रसिकांची मने जिंकली.
सामाजिक कार्यकर्ते संदीप जगताप यांनी प्रास्ताविक, तानाजी जगताप यांनी सूत्रसंचालन केले. एन. डी. जगताप, मोहन भोसले, दत्ता शिंदे, छगन कामथे, करण जगताप, मोहन चौधरी, धनंजय देशमुख, दत्ता कोळेकर, बाळासाहेब कदम, शिवाजी जगताप, निखिल शिवरकर, आकाश जगताप, वासिम मणेर, ज्ञानोबा जाधव आदींनी नियोजन केले.

Web Title: Think of Shivaji's thoughts: Ghone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.