भोसरी ट्रान्सफॉर्मर स्फोट प्रकरणातील तिसऱ्या गंभीर जखमी महिलेचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 02:56 PM2020-09-09T14:56:16+5:302020-09-09T14:56:31+5:30
महावितरणच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
भोसरी- भोसरी, इंद्रायणीनगर परिसरात महावितरणचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील तिघी गंभीर जखमी झाल्या. यात आजी आणि नातीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मृत्यूशी झुंज सुरू असलेल्या तिसऱ्या महिलेचा देखील बुधवारी (दि. ९) मृत्यू झाला. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसरी येथील इंद्रायणी नगरमधील राजवाड्यातील बिल्डिंग क्रमांक ३ जवळील विद्युत रोहित्राचा शनिवारी (दि. ५) दुपारी दीडच्या सुमारास भीषण स्फोट झाला.
या स्फोटांमध्ये शारदा दिलीप कोतवाल (वय ५१) त्यांची मुलगी हर्षदा सचिन काकडे (वय ३२) या नव्वद टक्के भाजल्या आहेत.त्यांची पाच महिन्यांची मुलगी शिवण्या सचिन काकडे ही सत्तर टक्के भाजली आहे. यात आजी व नातीचा शनिवारी मत्यु झाला तर हर्षदा यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली असून त्यांचा देखील मृत्यू झाला आहे.