‘त्या’ घरट्यांत चिमण्यांनी थाटला संसार
By Admin | Published: March 22, 2017 03:16 AM2017-03-22T03:16:46+5:302017-03-22T03:16:46+5:30
पिसावरे माध्यमिक विद्यालयात १० दिवसांपासून विद्यार्थ्यांनी जागतिक चिमणी दिनापूर्वीच चिऊताईसाठी विद्यालयातील पक्षी
भोर : पिसावरे माध्यमिक विद्यालयात १० दिवसांपासून विद्यार्थ्यांनी जागतिक चिमणी दिनापूर्वीच चिऊताईसाठी विद्यालयातील पक्षी निरीक्षक मंडळाने विद्यार्थ्यांसोबत चिमण्यांसाठी घरटी बनवली. ही घरटी विद्यालयाच्या आवारात लावण्यात आली. या सर्व घरट्यांचा चिऊतार्इंनी स्वीकार केला असून सर्व घरांमध्ये चिमण्यांनी आपला संसार थाटला आहे. उपक्रम सार्थ लागल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
भोर येथून ८ किमीवर असलेल्या पिसावरे माध्यमिक विद्यालयात मागील १० दिवसांपासून विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती.
जागतिक चिमणी दिनाच्या पार्श्वभूमीवर चिऊताईसाठी टाकाऊ पुठ्यांच्या गोलाकार नळकांड्यापासुन घरटी तयार करून ही घरटी व्हरांड्यात, सोलरच्या खांबावर, वर्गखोल्यांत अशा जागा निवडून टांगली होती. त्यात खाण्यासाठी धान्य भरलेली शिंकाळी टांगण्यात आली... आणि त्यानंतर सुरू झाली विद्यार्थ्यांची निरीक्षणे. इयत्ता ९वी च्या वर्गासमोरच्या घरट्यात चिऊताई राहण्यास आली. (वार्ताहर)