भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करणा-यांनी स्वत:चे चेहरे आरशात बघावेत - चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 06:22 PM2023-02-16T18:22:45+5:302023-02-16T18:22:55+5:30

सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता अशी ज्यांची विचारधारा आहे ते आमच्या विचारधारेशी बरोबरी करु शकत नाहीत

Those who accuse BJP of corruption should look at their own faces in the mirror - Chandrasekhar Bawankule | भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करणा-यांनी स्वत:चे चेहरे आरशात बघावेत - चंद्रशेखर बावनकुळे

भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करणा-यांनी स्वत:चे चेहरे आरशात बघावेत - चंद्रशेखर बावनकुळे

googlenewsNext

पिंपरी : भाजप विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढत आहे. भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करणा-यांनी स्वत:चे चेहरे आरशात बघितले पाहिजेत. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता अशी ज्यांची विचारधारा आहे. ते आमच्या विचारधारेशी बरोबरी करु शकत नाहीत. विरोधकांच्या आरोपात काही तथ्य नाही, सत्तेपासून पैसा आणि पैशातून सत्ता हे त्यांनी केले. त्यांच्या आरोपाला किती महत्व द्यायचे हे जनता ठरवेल, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आकुर्डीत पत्रकारांशी संवाद साधला.  निवडणूकीच्या तोंडावर माजी नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे? यावर बावनकुळे म्हणाले, राजीनाम्याने काहीही फरक पडत नाही. ’’

याला उभे करा, त्याला पाडा, हा आमचा व्यवसाय नाही

बंडखोर उमेदवाराला भाजपाचा पाठींबा आहे? यावर बावनकुळे म्हणाले, ‘‘बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना भाजपने उभे केले नाही. आम्ही कोणाला बोललो नाहीत. बंडखोरीशी आमचा काही संबंध नाही. त्यांची लढाई ते लढत आहेत. याला उभे करा, त्याला पाडा, हा आमचा व्यवसाय नाही. बंडखोरीचा फायदा-तोटा कोणाला होईल. यामध्ये आम्हाला काही रस नाही. किती मतांनी निवडून येवू हे जनतेवर सोडले पाहिजे.’’

Web Title: Those who accuse BJP of corruption should look at their own faces in the mirror - Chandrasekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.