Pimpri Chinchwad: गहाण वाहन जाळण्याची धमकी, साडेतीन लाख उकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 19:55 IST2023-12-02T19:54:38+5:302023-12-02T19:55:01+5:30
पिंपरी : व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याची गाडी परस्पर गहाण ठेवून ती जाळून टाकण्याची धमकी देत साडेतीन ...

Pimpri Chinchwad: गहाण वाहन जाळण्याची धमकी, साडेतीन लाख उकळले
पिंपरी : व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याची गाडी परस्पर गहाण ठेवून ती जाळून टाकण्याची धमकी देत साडेतीन लाख रुपये घेत फसवणूक केली.
ही घटना शुक्रवारी (दि. १) दिघी येथे घडली. या प्रकरणी मंगेश मारुती वाळके (वय ४०, रा. दिघी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आशिष गंगाधर मुटके (४२, रा. भोसरी), अरविंद रघुनाथ वंजारे (५२ रा. दिघी), अशोक रेवप्पा सावंत (४७) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगेश यांची गाडी संशयितांनी नेऊन ती परस्पर गहाण ठेवली. तसेच ती गाडी जाळून टाकण्याची व मंगेश यांना जिवे मारण्याची धमकी देत साडे तीन लाख रुपये उकळले.