नग्न व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी; खंडणीची उकळली, पिंपरीत तरुणाचे टोकाचे पाऊल

By नारायण बडगुजर | Updated: March 17, 2025 18:19 IST2025-03-17T18:18:17+5:302025-03-17T18:19:12+5:30

तरुणाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाकडे ५० हजारांची मागणी केली होती

Threat to make nude video viral; Extortion demanded, youth takes extreme step in Pimpri | नग्न व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी; खंडणीची उकळली, पिंपरीत तरुणाचे टोकाचे पाऊल

नग्न व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी; खंडणीची उकळली, पिंपरीत तरुणाचे टोकाचे पाऊल

पिंपरी : एक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर सहा तरुणांनी एका तरुणाला पिंपरी येथे भेटण्यासाठी बोलावले. तिथे त्याचे नग्न व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे घेत त्याला त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तरुणाने मेट्रो स्टेशनवरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सुजल सुनील मनकर (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुजल याचे वडील सुनील बाजीराव मनकर (४७, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणव किशोर शिंदे (वय २१), नितीन पाटील (२२), संदीप रोकडे (२०), आकाश चौरे (२०, चौघे रा. महेशनगर पिंपरी. मूळ रा. धुळे), लोपेश राजू पाटील (२०, महेशनगर, पिंपरी. मूळ रा. पातोंडा, जळगाव), प्रथमेश परशुराम जाधव (१९, महेशनगर, पिंपरी. मूळ रा. सातारा) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संशयित लोपेश पाटील आणि प्रथमेश जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून संपर्क करून संशयित सहा जणांनी मिळून सुजल याला महेशनगर पिंपरी येथे बोलावून घेतले. तिथे तरुणाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले. ते फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन सुजल याच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यातील ३५ हजार ५०० रुपये सुजल याने संशयिताना दिले. मात्र आणखी पैशांची मागणी करत संशयितांनी सुजल याला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून सुजल याने संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिस उपनिरीक्षक चिरंजीव दलालवाड तपास करीत आहेत.

Web Title: Threat to make nude video viral; Extortion demanded, youth takes extreme step in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.