कोयता फिरवत महिलेला जिवे मारण्याची धमकी, दहशत निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 20:31 IST2024-01-11T20:29:33+5:302024-01-11T20:31:33+5:30
याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे...

कोयता फिरवत महिलेला जिवे मारण्याची धमकी, दहशत निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी : कोयता आणि काठ्या हवेत फिरवत मोठमोठ्याने आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. ९) रात्री ओटास्कीम निगडी येथे घडली. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
अजय रामू चौधरी (वय २१, रा. रूपीनगर तळवडे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह रितेश सोनवणे आणि अनोळखी व्यक्तीच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघा जणांनी फिर्यादी महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ करून फिर्यादी यांच्या घराचे नुकसान केले. हातात कोयता आणि काठ्या घेऊन हवेत फिरवत मोठमोठ्याने आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.