Pimpri-Chinchwad Crime | फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 14:10 IST2023-04-01T14:06:06+5:302023-04-01T14:10:02+5:30
या प्रकरणी महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली...

Pimpri-Chinchwad Crime | फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
पिंपरी : आरोपीने महिलेला तिचे फोटो व्हायरल करण्याची तसेच तिच्या भावाला मारण्याची धमकी देत अत्याचार केला. ही घटना संत तुकारामनगर, शिर्डी, नांदेड परिसरात घडली. या प्रकरणी महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. ३०) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी बसवंत माधवराव गायकवाड (रा. बिलोली, नांदेड) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद यांना आरोपीने इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ओळख वाढवली. फिर्यादीने आरोपीला ब्लॉक केले असता आरोपीने तिला इतर नंबरवरून मेसेज करून पाठलाग केला. तसेच फिर्यादीच्या भावाला मारण्याची धमकी देत शिर्डी येथे बोलावून अत्याचार केला. फिर्यादी या नांदेड येथे गेल्या असता आरोपीने त्यांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.