Pimpri Chinchwad Crime | व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 11:48 IST2023-04-26T11:46:41+5:302023-04-26T11:48:51+5:30
ही घटना ऑगस्ट २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत दिघी, डुडुळगाव, टिंगरे नगर येथे घडली...

Pimpri Chinchwad Crime | व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
पिंपरी : माझ्यासोबत चॅटिंग करते हे तुझ्या घरी सांगतो, अशी बदनामी करण्याची महिलेला धमकी देत अत्याचार केला. अत्याचाराचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी महिलेला देण्यात आली. ही घटना ऑगस्ट २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत दिघी, डुडुळगाव, टिंगरे नगर येथे घडली. या प्रकरणी महिलेने सोमवारी (दि.२४) दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी राहुल रामभाऊ लांडगे (वय ४२, रा.बोपखेल) यांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माझ्यासोबत चॅटिंग करते, अशी बदनामी करण्याची धमकी आरोपीने फिर्यादीला दिली. तसेच फिर्यादी सोबत बळजबरीने शरीरसंबंध ठेवले. त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ऑगस्ट २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत फिर्यादीवर अत्याचार केला. तसेच फिर्यादीला शिवीगाळ करत धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.