विनयभंगप्रकरणी तिघांना अटक
By Admin | Published: January 10, 2015 01:00 AM2015-01-10T01:00:48+5:302015-01-10T01:00:48+5:30
शिवीगाळ करीत युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली.
पिंपरी : शिवीगाळ करीत युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली.
सौम्य उर्फ बाबू रंजन नायक (वय २६, रा. लांडेवाडी, भोसरी), सचिन नारायण चव्हाण (वय २१), अकीब फारूख शेख (वय १९, दोघेही रा. लांडगेनगर, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल गवळी यांनी दिलेली माहिती अशी : फिर्यादीच्या १५ वर्षीय युवतीला आरोपी त्रास देत होते. तसेच रस्त्याने येता-जाता शिवीगाळ करीत होते. याप्रकरणी युवतीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर तिघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली. दरम्यान, या युवतीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. युवतीने नेमका कशामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला हे स्पष्ट झालेले नाही. युवतीवर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिचा जबाब घेतल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल असेही गवळी यांनी सांगितले.
दरम्यान, शहरात छेडछाडीच्या प्रकारात वाढ झाली असून, पोलिसांनी ग्रस्त वाढविण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)