शहरातून ७० हजारांच्या तीन दुचाकींची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 06:14 PM2019-12-09T18:14:21+5:302019-12-09T18:18:11+5:30
वाहनचोरीच्या घटनांनी पिंपरी चिंचवडकर त्रस्त
पिंपरी : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच आहे. ७० हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत रविवारी (दि. ८) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीचोरीचा पहिला प्रकार भोसरी येथे दि. ४ आॅक्टोबर रोजी दुपारी पावणेएक ते रात्री साडेबारा दरम्यान घडला. याप्रकरणी सुनील रामराव पनबोने (वय ३८, रा. भारतमाता नगर, दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. फियार्दी सुनील यांनी त्यांची १० हजार रुपये किमतीची दुचाकी भोसरी येथे पुलाखाली पार्क केली होती. चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
दुचाकी चोरीचा दुसरा प्रकार शाहुनगर, चिंचवड येथे दि. ३० नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ ते १ डिसेंबर रोजी सकाळी सातच्या दरम्यान घडला. याप्रकरणी मालाजी सजेर्राव निंबाळकर (वय ५४, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फियार्दी निंबाळकर यांनी त्यांची १० हजार रुपये किमतीची दुचाकी शाहुनगर येथे लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
दुचाकी चोरीचा तिसरा प्रकार जुनी सांगवी येथे शनिवारी (दि. ७) रात्री साडेआठ ते रविवारी (दि. ८) सकाळी साडेआठच्या दरम्यान घडला. याप्रकरणी सुनील बबन हातोडे (वय ५२, रा. कुभारवाडा, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फियार्दी हातोडे यांनी त्यांची ५० हजार रुपये किमतीची दुचाकी जुनी सागंवीतील कुंभार वाडा येथे मंदिरातील मोकळ्या जागेत लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.