तीन दिवसांत ३२ बांधकामे भुईसपाट; शहर परिसरात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 03:36 AM2018-02-17T03:36:31+5:302018-02-17T03:36:39+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गेल्या तीन दिवसांत ३२ अनधिकृत बांधकामे पाडली आहेत.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गेल्या तीन दिवसांत ३२ अनधिकृत बांधकामे पाडली आहेत.
अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे. डिसेंबर २०१५ पर्यंतची बांधकामे नियमित करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानंतरची बांधकामांवर कारवाई करावी, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. याविषयी राष्टÑवादीने तक्रार केल्यानंतर महापालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.
पिंपरी आणि चिंचवड विधानसभा परिसरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली आहेत. पिंपळे सौदागर परिसरातील १२ अनधिकृत शेड पाडण्यात आले आहेत. स्वराज गार्डन ते गोविंद
गार्डन चौकापर्यंतच्या रस्त्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर पिंपळे निलख बाणेर रस्त्यावरील अठरा मीटर रस्त्यावरील चार
बांधकामे भुईसपाट करण्यात आली. त्यानंतर वाकड, पुलाजवळ आणि ताथवडे परिसरातील दहा पत्राशेड आणि तीन टपºयांवर कारवाई करण्यात आली. त्यासाठी दहा पोलीस, दहा मजूर यांच्या मार्फ त कारवाई करण्यात आली. तसेच अपघात होऊ नये म्हणून एक अग्निशामक दलाचे पथक, रुग्णवाहिका तैनात केली होती.