नगर अर्बन बँक फसवूणक प्रकरणी तीन डॉक्टरांना अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 09:09 PM2021-06-26T21:09:06+5:302021-06-26T21:09:36+5:30

२२ कोटींचे फसवणूक प्रकरण ; न्यायालयाने डॉक्टरांना सुनावली 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी

Three doctors arrested in Nagar Urban Bank fraud case; Pimpri-Chinchwad police action | नगर अर्बन बँक फसवूणक प्रकरणी तीन डॉक्टरांना अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

नगर अर्बन बँक फसवूणक प्रकरणी तीन डॉक्टरांना अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

googlenewsNext


पिंपरी : नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेत झालेल्या २२ कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणात अहमदनगर येथून तीन डॉक्टरांना शुक्रवारी (दि. २५) रात्री अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.  

डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे व डॉ. विनोद श्रीखंडे, अशी अटक झालेल्या तिघा डॉक्टरांची नावे आहेत. बँकेची फसवणूक करून घेतलेल्या कर्जाच्या रकमेतील सहा कोटी चार लाख रुपये या तिघा डॉक्टरांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 
नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेचे व्यवस्थापक महादेव साळवे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात २५ जानेवारी २०२१ रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण, मंजूदेवी हरिओम प्रसाद, रामचंद्र अण्णासाहेब तांबिले, अभिजित नाथा घुले यांच्यासह कर्ज उपसमिती सदस्य व बँकेच्या संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.  

आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरिक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत नगर येथील आशुतोष लांडगे याच्यासह आठ जणांना अटक केली आहे. दरम्यान लांडगे याच्या खात्यावर अपहारातील ११ कोटी रुपये वर्ग झाल्याचे तपासात समोर आले. तसेच तिघा डॉक्टरांच्या खात्यावरही रक्कम वर्ग झाल्याने या तिघा डॉक्टरांना अटक केली. या डॉक्टरांच्या खात्यावर अपहारातील रक्कम का वर्ग झाली, त्यांचा या अपहारात काही सहभाग आहे का, आदींबाबत चौकशी होणार आहे.   
-------------------------------
बँकेच्याविरोधात डॉक्टरांनी केली होती तक्रार 
अहमदनगर येथील एम्स हॉस्पिटलच्या मशिनरीसाठी नगर अर्बन बँकेत परस्पर खाते उघडून आमच्या नावे १८ कोटींचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे व डॉ. विनोंद श्रीखंडे यांनी २७ ऑगस्ट २०१९ रोजी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मात्र याबाबत गुन्हा दाखल न झाल्याने या तिघा डॉक्टरांनी औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी बँकेने चौकशी समिती नेमूण दोषींवर कारवाई करावी, असे आदेश न्यायालयाने दिले. मात्र यावर काहीच कार्यवाही झाली नाही. आता बँक प्रकरणी दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात या डॉक्टरांना अटक झाल्याने या प्रकरणातील गुंता आणखी वाढला आहे.

Web Title: Three doctors arrested in Nagar Urban Bank fraud case; Pimpri-Chinchwad police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.