Pimpri - Chinchwad: घरीच उपचार घेणा-यांशी बोलतात म्हणे तीन डॉक्टर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 10:58 AM2022-01-31T10:58:53+5:302022-01-31T10:59:05+5:30

गृहविलगीकरणातील रुग्णांना सलग आठ दिवस कॉल केला जातो

Three doctors say they talk to corona patients at home | Pimpri - Chinchwad: घरीच उपचार घेणा-यांशी बोलतात म्हणे तीन डॉक्टर?

Pimpri - Chinchwad: घरीच उपचार घेणा-यांशी बोलतात म्हणे तीन डॉक्टर?

Next

तेजस टवलारकर

पिंपरी : गृहविलगीकरणातील रूग्णांच्या तब्बेतीबाबत विचारपूस करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मुंबईत कॉल सेंटर निर्माण केल्याचे सांगण्यात येते. तसेच गृहविलगीकरणातील रुग्णांना सलग आठ दिवस कॉल केला जातो. त्या प्रत्येक कॉलमागे पालिका १३ रुपये संबंधित कॉल सेंटर कंपनीला देते. पण, प्रत्यक्षात कॉलच येत नसल्याचे लोकमतने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये आढळले होते. ज्या कंपनीला महापालिकेने काम दिले आहे. त्या कंपनीने रूग्णांशी संवाद साधण्यासाठी तीन डॉक्टरांची नेमणूक केली आहे. तर २० ते २५ ऑपरेटर नेमले आहेत. तीन शिफ्टमध्ये कॉल सेंटरचे काम सुरू असते, अशी माहिती महापालिकेतून पुढे येत आहे.

तीन शिफ्ट मिळून तीन डॉक्टर आहेत. याचाच अर्थ एका शिफ्टसाठी एक डॉक्टर ठेवण्यात आला आहे. यावरून रूग्णाशी ऑपरेटर किंवा स्थानिक रुग्णालयातूनच कॉल जात असण्याची शक्यता अधिक आहे. ऑपरेटर या तीन डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. तसेच रुग्णांना काय लक्षणे आहेत? त्यानुसार डॉक्टर रूग्णाशी संवाद साधतात, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. यातून नेमकं रूग्णाशी खरचं डॉक्टर बोलतात का? असा सवाल उपस्थित होत आहे. लोकमतने केलेल्या पाहणीत आणि रुग्णांकडून सांगण्यात आलेल्या अनुभवानुसार काही रुग्णांना आशा वर्करकडूनही कॉल आल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोनाचे जे रूग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. अशा रूग्णांना वैद्यकीय मदत तसेच डॉक्टरांचा सल्ला मिळावा म्हणून महापालिकेने कॉल सेंटर सुरू केले आहे. हे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. या कंपनीला प्रतिकॉल १३ रूपये दिले जातात. तसेच दोन महिन्यांसाठी हे काम दिले आहे. कोरोना दुसऱ्या लाटेत कॉल सेंटरचे काम याच कंपनीला दिले होते.

मागील काही दिवसात झालेले कॉल
तारीख, कॉल १३ जानेवारी : २६४६

१४ जानेवारी : ३७५४
१५ जानेवारी : ४१७७

१६ जानेवारी : ४५६८
१७ जानेवारी : ५१६८

१८ जानेवारी : ५८९६
१९ जानेवारी : ६१४२

२० जानेवारी : ६८२७
२२ जानेवारी : ८२४०

२३ जानेवारी : ८४७४
२४ जानेवारी : ८१३६

२५ जानेवारी : ८३१६
२६ जानेवारी : ७०४१

२७ जानेवारी : ६८६३
२८ जानेवारी ( सकाळी ११ पर्यंत ) १७५५

एकूण : ९५१२३

Web Title: Three doctors say they talk to corona patients at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.