पिंपरीत  एकाच दिवशी आत्महत्येच्या तीन घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 03:55 AM2017-08-09T03:55:50+5:302017-08-09T03:55:50+5:30

ताथवडे येथील सेंटोसा पर्ल या सोसायटीच्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारून एका उच्च शिक्षित विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दुपारी एकच्या सुमारास घडली़

Three incidents of suicides in one day on the same day | पिंपरीत  एकाच दिवशी आत्महत्येच्या तीन घटना

पिंपरीत  एकाच दिवशी आत्महत्येच्या तीन घटना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : ताथवडे येथील सेंटोसा पर्ल या सोसायटीच्या इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारून एका उच्च शिक्षित विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दुपारी एकच्या सुमारास घडली़ पाच महिन्यांपूर्वीच तिचा विवाह झाला होता. चेतल हेमकर्ण पाटील (वय २५, रा. ताथवडे) असे विवाहितेचे नाव असून आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. याशिवाय चिखलीत आणि दापोडीत आत्महत्येच्या आणखी दोन घटना दिवसभरात घडल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ताथवडे येथे राहणाºया चेतलचे पती हेमकर्ण कंपनीत गेले असता दुपारी ती आणि सासू दोघीच घरी होत्या. सदनिकेत केबल नेटवर्क समस्या असल्याचे कारण सांगून सुरक्षारक्षकाकडून तिने टेरेसची चावी घेतली. त्यानंतर काही वेळातच जमिनीवर जोरात काहीतरी आदळल्याचा आवाज आल्याने सोसायटीतील रहिवासी बाहेर आले. त्यांना चेतल जखमी अवस्थेत विव्हळत पडल्याचे दृश्य पहावयास मिळाले. येथून जाणारा एक टेम्पोचालक, काही तरुण, सोसायटीतील सुरक्षारक्षक यांनी तिला उचलून तत्काळ वाकड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चेतलचे आयटी अभियंता असलेल्या हेमकर्णशी पाच महिन्यांपूर्वी (फेब्रुवारीत) लग्न झाले होते. तिने एमटेक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. मूळचे नगर जिल्ह्यातील पाटील कुटुंबीय ताथवडे येथे भाड्याने राहत होते.

दुसरी आत्महत्येची आणखी एक घटना दापोडीत घडली. अनिषा नंदकुमार ठाकुरे (वय १६, रा. दापोडी), असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही या नैराश्येपोटी तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमरास घडली.

तिसरी घटना चिखलीतील जाधववाडी येथे घडली. एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. स्वप्निल माने असे तरुणाचे नाव आहे. स्वप्निल जाधववाडी येथे आपल्या बहिणीच्या घरी राहत होता. तो मिळेल ते काम करत असे. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.

Web Title: Three incidents of suicides in one day on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.