तीन अट्टल गुन्हेगार येरवडा कारागृहात स्थानबद्ध; पिंपरी, चाकण, हिंजवडी परिसरात कारवाई

By नारायण बडगुजर | Published: April 22, 2024 09:33 AM2024-04-22T09:33:43+5:302024-04-22T09:34:29+5:30

पिंपरी, चाकण आणि हिंजवडी परिसरातील तीन गुन्हेगारांना येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले...

Three inveterate criminals lodged in Yerawada Jail; Action in Pimpri, Chakan, Hinjewadi area | तीन अट्टल गुन्हेगार येरवडा कारागृहात स्थानबद्ध; पिंपरी, चाकण, हिंजवडी परिसरात कारवाई

तीन अट्टल गुन्हेगार येरवडा कारागृहात स्थानबद्ध; पिंपरी, चाकण, हिंजवडी परिसरात कारवाई

पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. यात पिंपरी, चाकण आणि हिंजवडी परिसरातील तीन गुन्हेगारांना येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले. 
 
सलमान रमजान शेख (२८, रा. साई श्रध्दा कॉलनी, नढेनगर, काळेवाडी), सतीश ऊर्फ प्रशांत बाबुराव दातार (२१, रा. खंडोबामाळ, आंबेडकरनगर, चाकण ता. खेड), शुभम रुपसिंग भाट (२६, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, थेरगाव, पुणे) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

पिंपरी, हिंजवडी, वाकड परिसरात गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार सलमान रमजान शेख हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह कोयत्यासारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत, चोरी व बेकायदेशिररित्या विनापरवाना घातक शस्त्रे जवळ बाळगणे यासारखे नऊ गंभीर गुन्हे केले आहेत. त्याचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालय येथे पिंपरी पोलिस ठाण्यातून पाठवण्यात आला होता.

चाकण परिसरात गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार सतीश ऊर्फ प्रशांत बाबुराव दातार हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह गंभीर दुखापत, खंडणी गोळा करणे, यासारखे तीन गंभीर गुन्हे केले. त्याचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव चाकण पोलिस ठाण्यातून पाठवण्यात आला होता.

हिंजवडी परिसरात गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार शुभम रुपसिंग भाट याने गावठी हातभट्टी तयार करणे, विक्री करणे अशा प्रकारचे सहा गुन्हे केले आहेत. त्याचा स्थानबध्दतेबाबतचा प्रस्ताव हिंजवडी पोलिस ठाण्यातून पाठवण्यात आला होता.

या तीनही प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करून पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी एमपीडीए (महाराष्ट्र जातीय, समजविरोधी व इतर विघातक कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८०) कायद्यान्वये येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्दतेचे आदेश दिले आहेत. यंदा पोलिस आयुक्तालय हद्दीतील सात गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई झाली. ही प्रतिबंधात्मक कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलिस आयुक्त चौबे यांनी सांगितले.

Web Title: Three inveterate criminals lodged in Yerawada Jail; Action in Pimpri, Chakan, Hinjewadi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.