लोणावळा परिसरात झालेल्या दत्ता केदारी खून प्रकरणी तीन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 05:20 PM2019-05-28T17:20:52+5:302019-05-28T17:22:38+5:30
लोणावळा : ताजे येथील दत्ता ज्ञानदेव केदारी (वय 32, रा. ताजे, मावळ) याचा खून केल्याप्रकरणी तीन जणांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चोवीस तासांच्या आत ...
लोणावळा : ताजे येथील दत्ता ज्ञानदेव केदारी (वय 32, रा. ताजे, मावळ) याचा खून केल्याप्रकरणी तीन जणांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चोवीस तासांच्या आत अटक केली.
सोमनाथ बाळू कोरडे (वय 22, रा. ताजे, मावळ), प्रशांत शांताराम आंबेकर (वय 21, रा. दत्त मंदिराजवळ देवले, मावळ), प्रविण लक्ष्मण गोणते (वय 21, रा. भैरवनाथ मंदिराजवळ देवले, मावळ) या खून प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरडे व केदारी यांचे भांडण आहे. या भांडणातून सहा महिन्यांपूर्वी केदारी यांनी कोरडे यांच्या कुटुंबातील एकाचा खून केला होता. या पूर्व वैमनस्यातून सोमनाथ कोरडे व त्याच्या मित्रांनी सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास औंढे मळवली रोडवरील देवले खिंडीतून दत्ता केदारी हा दुचाकी गाडीवरून घरी जात असताना त्याची गाडी आडवून त्याचा तलवार व कुर्हाडीने वार करत खून केला. याप्रकरणातील अन्य सुत्रधारांचा पोलीस शोध घेत असून त्यांच्यावे देखील कटाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पूर्व वैमनस्यातून खूनाच्या दोन घटना घडल्याने ताजे गावात भीतीचे वातावरण आहे.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे अधिकचा तपास करत आहेत.