डुडुळगावात ड्रेनेज लाइनवरून वाद होऊन तिघांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 15:46 IST2022-08-18T15:36:12+5:302022-08-18T15:46:04+5:30
पिंपरी : ड्रेनेज लाइन टाकण्यावरून वाद होऊन महिलेसह तिघांना काठी, लोखंडी राॅड व दगडाने मारहाण केली. डुडुळगाव येथे सोमवारी ...

डुडुळगावात ड्रेनेज लाइनवरून वाद होऊन तिघांना मारहाण
पिंपरी : ड्रेनेज लाइन टाकण्यावरून वाद होऊन महिलेसह तिघांना काठी, लोखंडी राॅड व दगडाने मारहाण केली. डुडुळगाव येथे सोमवारी (दि. १५) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.
नीतेश बाळासाहेब वायदंडे (वय २८, रा. मोशी) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. १७) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. स्वप्नील सुखदेव कदम, सागर सुखदेव कदम, सुखदेव सीताराम कदम (तिघेही रा. डुडुळगाव) यांच्यासह दोन महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या शेजारी राहण्यास आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून भांडणे आहेत. फिर्यादी हे ड्रेनेज पाईपलाइन टाकण्याचे काम करत होते. त्यावेळी ड्रेनेज लाइन टाकण्यावरून वाद होऊन आरोपींनी फिर्यादीला व त्यांचा भाऊ नीलेश व आई यांना काठी, लोखंडी राॅड व दगडाने मारहाण करून फिर्यादीला गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे.