शाईफेक प्रकरणानंतर तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संलग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 09:11 AM2022-12-12T09:11:36+5:302022-12-12T09:11:44+5:30

रविवारी रात्री पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेश दिले

Three senior police inspectors attached after ink throw case | शाईफेक प्रकरणानंतर तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संलग्न

शाईफेक प्रकरणानंतर तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संलग्न

googlenewsNext

पिंपरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी (दि. १०) झालेल्या शाईफेकीनंतर रविवारी (दि. ११) पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना संलग्न करण्यात आले. याबाबत रविवारी रात्री पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेश दिले.

पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांना विशेष शाखा एक येथे संलग्न केले आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचा प्रभार पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे यांच्याकडे दिला आहे. गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र पंडित यांना चिंचवड पोलीस ठाण्यात संलग्न केले आहे. चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना पिंपरी वाहतूक विभागात संलग्न केले आहे. प्रशासकीय व बंदोबस्ताच्या कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात संलग्न करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद आहे.

Web Title: Three senior police inspectors attached after ink throw case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.