By admin | Published: February 8, 2017 11:25 PM2017-02-08T23:25:57+5:302017-02-08T23:25:57+5:30
आरपीआयचे तीन निलंबीत
Next
पिंपरी : भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणाºया रिपब्लिकन पार्टीच्या पुण्यातील उमेदवारांसह पिंपरीतील तील उमेदवारांना निलंबित केले आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आठवले गट) पुणे शहर कार्यकारिणी बरखास्त बरखास्त करून निलंबित केले आहे.
मुंबई वगळता अन्य भागांमध्ये रिपाइंने स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भाजपकडे आरपीआयने युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, भाजपने त्यावर निर्णय न घेता आरपीआयच्या उमेदवारांना परस्पर कमळ चिन्ह दिले. परिणामी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणा-या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात रिपाइंच्या उमेदवारांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे ही कारवाई केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पक्षाची पुणे शहर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे राज्यातील सरचिटणीस राजा सरवदे यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवडच्याही तीन उमेदवारांना निलंबित केले आहे.