पाच कोटींची तीन वाहने
By admin | Published: January 9, 2017 03:07 AM2017-01-09T03:07:54+5:302017-01-09T03:07:54+5:30
आरोप-प्रत्यारोप होत असताना महापालिकेतील स्थायी समिती टक्केवारीतच गुंतल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या
पिंपरी : आरोप-प्रत्यारोप होत असताना महापालिकेतील स्थायी समिती टक्केवारीतच गुंतल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत १३ कोटींहून अधिक रकमेच्या वाढीव खर्चास मान्यता दिली. पाच कोटी रुपये खर्चून तीन वाहने खरेदी करावीत, असा विषय स्थायी समितीने मंजूर केला आहे.
डांगे चौक ते वाकड भुयारी मार्गापर्यंतच्या ४५ मीटर रुंद रस्त्याचे आणि वाकड भुयारी मार्ग ते महापालिका हद्दीपर्यंतच्या ३० मीटर रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याचे काम सुरू आहे. या दोन्ही कामांची मूळ निविदा अनुक्रमे २३ कोटी २७ लाख आणि २३ कोटी १४ लाख आहे. त्यांचा निविदा दर २९.९९ टक्के आणि ३०.८७ टक्के कमी आहे. त्यानुसार डांगे चौक ते वाकड भुयारी मार्गापर्यंतच्या कामासाठी १६ कोटी २९ लाख खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. तर वाकड भुयारी मार्ग ते महापालिका हद्दीपर्यंतच्या १६ कोटी ८० लाख खर्चास ११ फेब्रुवारी १६ रोजी मान्यता दिली आहे. डांगे चौक ते वाकड भुयारी मार्गापर्यंतच्या रस्त्यालगतचे जोड रस्ते, तसेच देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गालगतच्या या रस्त्याला जोडणारा रस्ता अतिशय खराब झाला आहे. त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच वाकड भुयारी मार्ग ते महापालिका हद्दीपर्यंतच्या रस्त्यालगत हिंजवडी ग्रामपंचायत कार्यालयापर्यंतचा जोड रस्ताही खराब झाला आहे. डांगे चौकातून भूमकर चौकाकडे जाताना वाकडगावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी, तसेच हिंजवडी व मारुंजी या रस्त्याजवळ वाहतुकीची कोंडी होते. या दोन्ही रस्त्यांच्या मूळ निविदा रकमेप्रमाणे अतिरिक्त पोहोच रस्त्याचे काम करण्याची तयारी ठेकेदाराने दर्शविली आहे. (प्रतिनिधी)