अपघातात महिलेसह तीन जखमी

By admin | Published: September 4, 2015 01:58 AM2015-09-04T01:58:13+5:302015-09-04T01:58:13+5:30

भरधाव आलेल्या एसटीने दोन कारना धडक दिल्याने एका महिलेसह तिघे जण जखमी झाले. धडक दिल्यानंतर एसटी पुलाच्या कठड्याचा अडथळा आल्याने थांबली अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.

Three women injured in accident | अपघातात महिलेसह तीन जखमी

अपघातात महिलेसह तीन जखमी

Next

लोणी काळभोर : भरधाव आलेल्या एसटीने दोन कारना धडक दिल्याने एका महिलेसह तिघे जण जखमी झाले. धडक दिल्यानंतर एसटी पुलाच्या कठड्याचा अडथळा आल्याने थांबली अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.
पोलीस निरीक्षक बंडोपंत कौंडुभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात दोन सप्टेंबर रोजी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर फाटा येथे झाला. यामध्ये आय-२० कारचालक अमोल नागेश कुंजीर (वय २८ वर्षे, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) हे गंभीर जखमी झाले असून, एसटी कंडक्टर उत्रेश्वर मछिंद्र मांजरे (वय ५४ वर्षे, रा. देगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) व चिरफडी, ता. बार्शी येथील आपल्या नातीस भेटून घरी परतत असलेल्या महिला प्रवासी शारदा बळीराम गलांडे (वय ५५ वर्षे, रा. पर्वती पायथा, पुणे) हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
जखमी अमोल कुंजीर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांचे लोणी स्टेशन परिसरांत खोलेवस्ती येथे एक केक शॉपी असून, नेहमीच्या वेळेस दुकान बंद करून ते आपल्या कारमधून घरी निघाले होते. रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास ते पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी फाटा येथे आले. त्या वेळी लोणी काळभोर गावाकडे जाण्यासाठी स्वीफ्ट कार थांबली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या गाडीचा वेग कमी केला. त्याच वेळी बार्शी येथून बोरीवली येथे निघालेली एसटी वेगाने आली व तिने वळण्यासाठी थांबलेल्या स्वीफ्ट कारला धडक दिली. त्यामुळे एसटी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व एसटी रस्तादुभाजकावर चढली आणि आय-२० कारला धडकली. त्यानंतर सुमारे शंभर फूट पुढे जाऊन पुलाच्या कठड्याला धडकून जागीच थांबल्यामुळे मोठा अनर्थ टळला. एसटी पुलावरून खाली पडली असती, तर बारा प्रवाशांसमवेत वाहक व
चालक यांचा जीव धोक्यात आला असता. (वार्ताहर)

Web Title: Three women injured in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.