तिरंगा पदयात्रेत ‘रॅण्डवधाचा थरार’; चिंचवड येथे मिरवणुकीतून क्रांतीवीर चापेकर बंधूंना अभिवादन

By नारायण बडगुजर | Published: April 18, 2023 06:33 PM2023-04-18T18:33:15+5:302023-04-18T18:36:09+5:30

१८ एप्रिल या दामोदर हरी चापेकर यांच्या हुतात्मादिनानिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीतर्फे सोमवारी सायंकाळी अभिवादन फेरीचे आयोजन केले होते...

Thrill of rand murder in Tricolor Padayatra; Greetings to Krantiveer Chapekar brothers from a procession at Chinchwad | तिरंगा पदयात्रेत ‘रॅण्डवधाचा थरार’; चिंचवड येथे मिरवणुकीतून क्रांतीवीर चापेकर बंधूंना अभिवादन

तिरंगा पदयात्रेत ‘रॅण्डवधाचा थरार’; चिंचवड येथे मिरवणुकीतून क्रांतीवीर चापेकर बंधूंना अभिवादन

googlenewsNext

पिंपरी : भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि १८ एप्रिल या दामोदर हरी चापेकर यांच्या हुतात्मादिनानिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीतर्फे सोमवारी सायंकाळी अभिवादन फेरीचे आयोजन केले होते. चिंचवडगावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् पासून अभिवादन फेरी निघाली. केशवनगर शाळा, काकडे पार्क, श्री शिवाजी उदय मंडळ, प्रदीप स्वीट्स, पॉवरहाउस चौक, क्रांतिवीर चापेकर चौक, गांधी पेठ या मार्गाने क्रमण करीत क्रांतितीर्थ चापेकर वाडा येथे फेरीचा समारोप झाला.

आमदार अश्विनी जगताप, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, ॲड. मोरेश्वर शेडगे, शीतल शिंदे, नामदेव ढाके, पद्मश्री गिरीश प्रभुणे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, सहकार्यवाह रवींद्र नामदे, नितीन बारणे, मिलिंद देशपांडे, हेमंत हरहरे, माहेश्वर मराठे, नितीन वाटकर, धनंजय गावडे उपस्थित होते.‌

भारतमाता चित्ररथ, ५०० फूट लांबीची तिरंगा पदयात्रा, मशाल मिरवणूक, रॅण्डवध देखावा, चापेकर बंधूंच्या जीवनाविषयी ५ चित्ररथ, मुलींचे ढोलताशा पथक, मुलींचे लेझीम पथक, तुतारी आणि सनईचौघडा पथक, लोककलावंत हलगी पथक, जनजाती क्रांतिकारक पथक आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके अशा विविध आकर्षणांचा समावेश असलेल्या अभिवादन फेरीला समाजातील विविध मान्यवर आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून, रांगोळ्या काढून तसेच पंचारती ओवाळून, फटाक्यांची आतषबाजी आणि 'भारतमाता की जय' अशा घोषणा देत फेरीचे स्वागत करण्यात आले. यानिमित्त क्रांतितीर्थावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.‌

लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय - थेरगाव, खिंवसरा पाटील विद्यामंदिर - थेरगाव, क्रांतिवीर चापेकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय - चिंचवड, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् - चिंचवड या शाळांमधील विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी फेरीमध्ये सहभागी झाले होते. मातृसेवा संस्थेतर्फे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती. अभिवादन फेरी प्रमुख गतिराम भोईर, तेजस चवरे, संजय कुलकर्णी, अविनाश अगज्ञान, शाहीर आसराम कसबे, नटराज जगताप, अश्विनी बाविस्कर, पूनम गुजर, वासंती तिकोणे, वर्षा जाधव, योगिनी शिंदे, मारुती वाघमारे, सतीश अवचार, अतुल आडे, हर्षदा धुमाळ, दीपाली शिंदे यांनी संयोजन केले.

Web Title: Thrill of rand murder in Tricolor Padayatra; Greetings to Krantiveer Chapekar brothers from a procession at Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.