अधिकाऱ्याच्या अंगावर फेकली शाई

By admin | Published: July 8, 2017 02:16 AM2017-07-08T02:16:41+5:302017-07-08T02:16:41+5:30

तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या सोमाटणे जलउपसा केंद्रावरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ऐन पावसाळ्यात पाणी

Throwing on the official's hand | अधिकाऱ्याच्या अंगावर फेकली शाई

अधिकाऱ्याच्या अंगावर फेकली शाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या सोमाटणे जलउपसा केंद्रावरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ऐन पावसाळ्यात पाणी मिळत नसल्याने भाजपा-जनसेवा विकास समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी महावितरणची येथील महिला अधिकारी आणि नगरसेवकांनी वडगाव केंद्र अधिकाऱ्याच्या तोंडावर शाई फेकून निषेध व्यक्त केला. विद्युतपुरवठा सुरळीत न केल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा पाणीपुरवठा समितीचे सभापती तथा उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी या वेळी दिला.
गेल्या ७२ तासांपासून पवनानदीवरील सोमाटणे पंप-हाऊसचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संपूर्ण तळेगाव शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेस त्याचा फटका बसला आहे. त्याच्या निषेधार्थ उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी भाजपा व जनसेवा विकास समितीने महावितरणच्या येथील कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला.
वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याबाबत नगरपालिकेने वारंवार तक्रारी करूनही महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्याने तसेच अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने दोन्ही पक्षाचे नगरसेवक आणि संतप्त कार्यकर्त्यांनी या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या अंगावर काळी शाई फेकली.
दरम्यान, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता एम. पी. तेलके यांच्यावर मोर्चेकरांना प्रश्नांचा भडीमार केला.
या वेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, सत्तारूढ पक्षनेते सुशील सैंदाणे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, भाजपाचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे-पाटील, नगरसेवक संदीप शेळके, अरुण भेगडे, संग्राम काकडे, संतोष शिंदे, अमोल शेटे, अतुल मराठे, नगरसेविका नीता काळोखे, शोभा भेगडे, काजल गटे, अनिता पवार, रजनी ठाकूर, मंगल जाधव, आशितोष हेन्द्रे, अजय भेगडे मोर्चात सहभागी झाले होते.
दरम्यान मावळ तालुक्यामध्ये अनेक नागरिकांनी सेकंड होमसाठी पसंती दिली आहे.
परंतु वाढत्या भारनियमनाच्या त्रासाने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याचा परिणाम बांधकाम व्यावसायावरही झाला आहे. तसेच उद्योगधंद्यावरही मोठ्याप्रमाणात परिणाम होत आहे.
वीजेच्या भारनियमन आणि खंडीत वीजपुरवठ्यातून मावळ तालुक्याची सुटका करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. परंतु याकडे विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. अशी तक्रार परिसरातील नागरिक करत आहेत.

नागरिकांचे हाल : पाणी मिळत नसल्याने गैरसोय

महावितरण कंपनीस नगरपालिका दरमहा सुमारे २५ ते ३० लाख रुपये वीजबिलापोटी देत असते. सर्वात जास्त महसूल देणाऱ्या ग्राहकास कंपनीकडून व्यवस्थित सेवा मिळत नाही. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीउपसा करणे आणि वितरण यांचा मेळ साधता येत नाही. ऐन पावसाळ्यात लोकांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत. वीज कंपनीचे अधिकारी सार्वजनिक पाणी वितरणाच्या समस्येबाबत अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत.
- सुनील शेळके, उपनगराध्यक्ष

Web Title: Throwing on the official's hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.