भाकरीचा चंद्र शोधण्याची पुन्हा वेळ

By admin | Published: February 21, 2017 02:24 AM2017-02-21T02:24:41+5:302017-02-21T02:24:41+5:30

कामगारांना मिळालेला निवडणुकांच्या प्रचाराचा रोजगार आता बंद झाला आहे. मजूर अड्ड्यावर दिवसभर काम मिळण्याची वाट

Time to find the bread of the bread | भाकरीचा चंद्र शोधण्याची पुन्हा वेळ

भाकरीचा चंद्र शोधण्याची पुन्हा वेळ

Next

भोसरी : कामगारांना मिळालेला निवडणुकांच्या प्रचाराचा रोजगार आता बंद झाला आहे. मजूर अड्ड्यावर दिवसभर काम मिळण्याची वाट बघण्यापेक्षा अनेक कामगारांनी निवडणूक प्रचार काळात विविध पक्षांचे झेंडे हाती घेऊन जोमाने प्रचार केला. पण आता मात्र प्रचाराचे वारे थंडावल्यामुळे ते झेंडे आणि ते काम हिसकावले गेले आहेत. आता प्रचाराची लढाई संपल्यावर ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ हा प्रश्न मजुरांसाठी निरुत्तरित असून, पुन्हा या कामगारांची मजूर अड्ड्यावर रोजगाराची लढाई सुरू झाल्याचे नेहमीचे चित्र दिसू लागले आहे.
भोसरी, एमआयडीसी, देहूफाटा येथील कामगारांना महापालिकांच्या निवडणुकांमध्ये चांगली मागणी होती. अनेक जणांनी पिंपरी-चिंचवडच्या निवडणुकांच्या प्रचारात पैसे घेऊन प्रचाराचे झेंडे हाती घेतले होते. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांपेक्षा महापालिकांमध्ये दारोदारी फिरत थेट प्रचाराचे तंत्र सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अवलंबिले होते. चाळी आणि बिल्डिंगमध्येही फिरताना सोबत कार्यकर्त्यांची फौज असेल, तरच उमेदवाराचा प्रभाव पडतो. (वार्ताहर)

Web Title: Time to find the bread of the bread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.