पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ
By Admin | Published: March 20, 2017 04:27 AM2017-03-20T04:27:31+5:302017-03-20T04:27:31+5:30
शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून, या भागातील छोटे-मोठे बंधारे
शिक्रापूर : शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून, या भागातील छोटे-मोठे बंधारे, के. टी. बंधारे सध्या कोरडे पडले आहेत.
शिक्रापूर, पाबळ, धामारी, खैरेनगर, खैरेवाडीबरोबरच येथील वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. जलयुक्त शिवारातून या भागात मोठ्या प्रमाणावर छोट्या-मोठ्या बंधाऱ्यांची कामे करण्यात आली. पावसाळ्याअगोदर व काहीसा पावसाचा सूर असताना या भागातील बंधारे खोलीकरण करण्यात आले. अनेक भागातील छोटी तळी व ओढ्याचे खोलीकरणदेखील करण्यात आले; परंतु अल्पशा पावसाने जानेवारीपर्यंत काही ठिकाणी पाणी राहिले, तर अनेक के.टी.बंधारे खोलीकरण करूनही पाणी साचले नाही. काही भागात मोठ्या प्रमाणावर खर्च करून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून कामे झाली; परंतु चालू वर्षी त्याचा ३० टक्केदेखील फायदा झाला नसल्याचे शेतकरीवर्गातून सांगण्यात येत आहे. (वार्ताहर)