Pimpri Chinchwad Crime: सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या, थेरगावमधील घटना
By नारायण बडगुजर | Updated: October 18, 2023 10:15 IST2023-10-18T10:14:37+5:302023-10-18T10:15:01+5:30
कंटाळून जावयाने गळफास घेत आत्महत्या केली...

Pimpri Chinchwad Crime: सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या, थेरगावमधील घटना
पिंपरी : सासरच्यांनी जावयाकडून पैसे घेतले. मात्र पैसे मागितले असता ते परत न करता सासरच्यांनी जावयाचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्याला कंटाळून जावयाने गळफास घेत आत्महत्या केली. थेरगाव येथे २५ ऑगस्ट २०२३ रोजी ही घटना घडली.
मुकेश धनीराम शर्मा (३४, रा. थेरगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुकेश याचा भाऊ राजकुमार धनीराम शर्मा (३८, रा. मध्य प्रदेश) यांनी वाकड पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. १६) फिर्याद दिली. त्यानुसार मुकेश याच्या सासरकडील कृपाशंकर शर्मा (६०), पंकज कृपाशंकर शर्मा (३६), राघबिंद परमार (२८) व दोन महिला (सर्व रा. मध्य प्रदेश) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश याचे २०१५मध्ये लग्न झाले. त्यानंतर सासरच्यांनी त्याच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यानुसार मुकेश याने सासरच्यांना पैसे दिले. ते पैसे परत द्या, असा तगादा मुकेश याने लावला. मात्र, सासरच्यांनी पैसे परत केले नाही. ते मुकेश याचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. या त्रासाला कंटाळून मुकेश याने थेरगाव येथील त्याच्या भाड्याच्या खोलीत २५ ऑगस्ट रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास फॅनला वायरने गळफास घेत आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक शंतनू नाइकनिंबाळकर तपास करीत आहेत.