आई - वडिलांच्या त्रासाला कंटाळून मुलाने प्यायले विष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 03:06 PM2022-11-13T15:06:19+5:302022-11-13T15:06:33+5:30
मुलावर दवाखान्यात उपचार करण्यात आले असून ते संकाटाच्या बाहेर असल्याचेही पोलिसांनी सांगितले
पिंपरी : दत्तक मुलाकडून दुकानात काम करून घेतले. त्याचे शिक्षण देखील अर्धवट ठेवले. मात्र, त्याला घरातून हकलून देण्याची धमकी देत मानसिक त्रास देण्यात आला. आई-वडिलांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून मिळणाऱ्या या वागणुकीमुळे मुलाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि.११) रात्री साडेआठच्या सुमारास पिंपरीतील सलून सिझर ॲन्ड रेझर या दुकानात घडली. या प्रकरणी या प्रकरणी हिदायत अन्वर शेख (वय २९, पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.१२) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीचे आई-वडिल, एक महिला आणि एका नातेवाईकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याला आरोपींनी लहानपणीच दत्तक घेतले होते. त्यांनी फिर्यादीला केवळ सातवीपर्यंत शिकवून आपल्या दुकानात कामाला ठेवले. लहानपणापूसन फिर्यादी दुकानातील काम पाहून सर्व पैसे आरोपी वडिलांकडे देत होते. मात्र, सर्व आरोपींनी मिळून फिर्यादीला मानसिक त्रास देत शिवीगाळ करत. त्यामुळे वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून फिर्यादीने आत्महत्या करण्यासाठी विषारी औषध प्राशन केले. फिर्यादीवर दवाखान्यात उपचार करण्यात आले असून ते संकाटाच्या बाहेर असल्याचेही पोलिसांनी सांगितले.