छळाला कंटाळून पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; साथीदारांच्या मदतीने केला पतीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 03:06 PM2022-02-13T15:06:22+5:302022-02-13T15:06:30+5:30

पतीची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचीही विल्हेवाट लावली

Tired of persecution his wife took the last step Husband murdered with the help of accomplices | छळाला कंटाळून पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; साथीदारांच्या मदतीने केला पतीचा खून

छळाला कंटाळून पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; साथीदारांच्या मदतीने केला पतीचा खून

Next

पिंपरी : छळ करतो म्हणून पतीची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. साथीदारांच्या मदतीने पत्नीने हा खून केल्याचा हा धक्कादायक प्रकार देहूगाव परिसरात उघडकीस आला. ही घटना ३० जानेवारीला रात्री अकराच्या सुमारास घडली. 

आकाश अशोक गोरखे, असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. पत्नी ज्योती आकाश गोरखे (वय १९), तिचे साथीदार सोनी उमेश जेगरे (वय ३१), रवी धनू राठोड (वय २९, रा. देहूरोड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह अक्षय लोंढे (रा. जाधववाडी, चिखली), राम विजय महोतो (रा. पटणा, बिहार), साहिल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार बळीराम चव्हाण यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. १२) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस ठाण्यात आकाश गोरखे याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल होती. त्याबाबत देहूरोड पोलीस तपास करीत होते. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली. बेपत्ता असलेल्या आकाश गोरखे याचा त्याच्या पत्नीने साथीदारांच्या मदतीने खून केला असल्याचे समोर आले. आकाश गोरखे हा पत्नी आरोपी ज्योती हिला मारहाण करून छळ करत होता. त्या कारणावरून आरोपी सोनी, ज्योती आणि रवी यांनी आकाश याचा खून करण्याचा कट रचला. आरोपी अक्षय, राम आणि साहिल यांनी ३० जानेवारी २०२२ रोजी रात्री ११ वाजता आकाश गोरखे याला देहूगाव कमान येथून अज्ञात ठिकाणी नेले. तिथे आरोपींनी आकाश याला मारहाण करून त्याचा खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. बेपत्ता असलेल्या आकाशचा तपास केल्यानंतर पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळाली. पोलिसांनी पत्नी ज्योती व तिचे साथीदार सोनी आणि रवी या तिघांना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील तपास करीत आहेत.

Web Title: Tired of persecution his wife took the last step Husband murdered with the help of accomplices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.