दुसऱ्या पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, पहिल्या पत्नीची पोलिसांत धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 17:02 IST2023-06-26T17:02:06+5:302023-06-26T17:02:53+5:30
हा प्रकार जून २०२२ ते २५ मे २०२३ या कालावधीत चिंचवड येथील वल्हेकरवाडी येथे घडला...

दुसऱ्या पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, पहिल्या पत्नीची पोलिसांत धाव
पिंपरी : दुसऱ्या पत्नीने पतीचा शारीरिक व मानसिक छळ केला. दुसऱ्या पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. याप्रकरणी पहिल्या पत्नीने चिंचवड पोलिस ठाण्यात धाव घेत तिघांविरुद्ध तक्रार दिली. हा प्रकार जून २०२२ ते २५ मे २०२३ या कालावधीत चिंचवड येथील वल्हेकरवाडी येथे घडला.
याप्रकरणी पहिल्या पत्नीने चिंचवड पोलिस ठाण्यात रविवारी ( दि.२५) फिर्याद दिली. त्यानुसार, पतीची दुसरी पत्नी तसेच आणखी एक महिला आरोपी व आदित्य राजगुरू (सर्व रा. चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत पतीचे नाव दयानंद अरुण रावडे (वय ३६, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती दयानंद रावडे यांनी दुसऱ्या महिलेशी दुसरा विवाह करत संसार थाटला. परंतु आरोपींनी पैशाच्या कारणावरून पतीचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. याबाबत तिघांविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.