लोकमत कार्यालयाचा आज वर्धापनदिन
By admin | Published: March 21, 2016 12:28 AM2016-03-21T00:28:37+5:302016-03-21T00:28:37+5:30
लोकमत’ पिंपरी-चिंचवड आवृत्तीचा १६वा वर्धापन दिन सोहळा सोमवारी (दि. २१ मार्च) साजरा होत आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी पाच ते आठ या वेळेत स्नेहमेळावा होणार आहे.
पिंपरी : ‘लोकमत’ पिंपरी-चिंचवड आवृत्तीचा १६वा वर्धापन दिन सोहळा सोमवारी (दि. २१ मार्च) साजरा होत आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी पाच ते आठ या वेळेत स्नेहमेळावा होणार आहे.
महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या ‘लोकमत’ची पिंपरी-चिंचवड शहर परिसरात दमदार वाटचाल सुरू आहे. समाजहितासाठी आक्रमकता आणि विधायक दृष्टिकोनामुळे लोकमत पुणे जिल्ह्यातील जनतेचा आवाज बनला आहे. वाचकांच्या भरभक्कम, उदंड पाठबळावरच्या या अग्रेसर प्रवासात ऋणानुबंधाच्या गाठी आणखी घट्ट करणारा सोहळा म्हणजेच पिंपरी-चिंचवड कार्यालयाचा वर्धापन दिन.
पिंपरी-चिंचवड नगरीतील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, उद्योग, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच ‘लोकमत’च्या वाचकांचा यानिमित्त स्नेहमेळावा होणार आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी होणाऱ्या सोहळ्यात शहराच्या विकासावर आधारित असणाऱ्या ‘व्हीजन पिंपरी-चिंचवड’ या वर्धापन दिन विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. वाचक, विक्रेते, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत परिवारातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)