महापालिकेच्या वतीने आज रोजगार मेळावा
By admin | Published: March 24, 2017 04:13 AM2017-03-24T04:13:08+5:302017-03-24T04:13:08+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत महापालिका हद्दीतील लाभार्थ्यांना रोजगार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत महापालिका हद्दीतील लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.
चिंचवड येथील आॅटो क्लस्टर येथे शुक्रवार, दि. २४ मार्च २०१७ रोजी सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान मेळावा होणार आहे. महापौर काळजे यांच्या अध्यक्षतेखाली मेळाव्याचे उद्घाटन पालक मंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, गटनेते राहुल कलाटे, कैलास बारणे, सचिन चिखले, आयुक्त दिनेश वाघमारे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्या कंपनीतील रिक्त पदांसाठी मुलाखती घेणार आहेत. मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अहर्ता व वैयक्तिक माहितीच्या प्रतीसह सकाळी ९ वाजता नोंदणीकामी आॅटो क्लस्टर हॉल - अ सायन्स पार्कजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)