टोलमाफीचे आश्वासन खोटे
By admin | Published: April 24, 2017 04:46 AM2017-04-24T04:46:57+5:302017-04-24T04:46:57+5:30
टोलमाफीचे आश्वासन हे इतर आश्वासनांप्रमाणे खोटे ठरले आहे असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग
किवळे : टोलमाफीचे आश्वासन हे इतर आश्वासनांप्रमाणे खोटे ठरले आहे असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुन्या महामार्गावरील टोल बंद करण्यासाठी पक्षाच्या वतीने रविवारी किवळे येथे आंदोलन करण्यात आले.
मूळ भांडवलावरचा परतावा, कार्यालयीन खर्च, दुरुस्ती, देखभाल, सुविधा खर्च या सर्व बाबीशिवाय पुढील दोन वर्षांचा देखभाल, हा सर्व खर्च या टोल वसुलीच्या उद्दिष्ट असलेल्या ४३३० कोटींत गृहीत धरलेला आहे. असे असतानाही हा टोल एक एप्रिलपासून वाढवला असून, हा टोल अजून दोन वर्षे चालू राहणार असल्याचे शासनाचे म्हणणे असल्याचे नमूद केले आहे. महामार्गावरील गतवर्षाची टोलवसुली अनुक्रमे ४८३ कोटी व १९६ कोटी आहे. म्हणजेच येत्या दोन वर्षांत जनतेच्या खिशातून अंदाजे १४०० कोटी रुपये टोल जमा होईल. कंत्राटदाराच्या सोयीचा टोल रद्द करा आणि सदोष करार करणाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनात समन्वयक मुकुंद किर्दत, आनंद यादव, अय्याज सय्यद, आशुतोष शिपलकर , चंद्रकांत पानसे, संदीप सोनावणे, अभिजीत मोरे, चेतन बेंद्रे, राजेश चौधरी, गजानन भोसले, वहाब शेख, विक्रम गायकवाड आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)