मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस; मुळशी धरण १०० टक्के तर पवना धरण ६८ टक्के भरले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 07:24 PM2020-08-16T19:24:35+5:302020-08-16T19:25:15+5:30
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी,शेतकरी वर्गाला दिलासा
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाचा जोर कायम आहे.त्यामुळे मावळमधील धरणांच्य पाणीसाठ्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. मुुळशी धरण १०० टक्के , पवना धरण ६७.८०, वडीवळे ८६.८० तर आंद्रा धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.
पवना धरण पाणलोट क्षेत्रात १ जून पासून आत्तापर्यंत १ हजार ८५ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. ३१ जुलैपर्यंत धरणात ३३.६० पाणीसाठा होता.परंतु, पावसाचा जोर वाढल्याने ६७.८० झाला आहे अशी माहिती पवनाधरण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी यांनी दिली.
वडीवळे धरण ८६.८० टक्के भरले असून २०९५ क्यूसेसने पाणी सोडले आहे. धरणात गेल्यावर्षी १०० टक्के पाणी साठा होता. आत्ता पर्यत १ ४६७ मिलीमीटार पाऊसाची नोंद आहे या धरणाच्या पाण्यावर भाजगाव, शिरोदा, सोमवडी, करंजगाव, कोंडीवडे, साई, नाणोली, खडकाळा, पाथरगाव, टाकवे यासह बावीस गावच्या नळपाणीपुरवठा योजना आहेत. पाणीसाठा वाढल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे, अशी माहिती वडिवळे धरण शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली.
आंद्रा धरणात १०० टक्के भरले असून ३३५क्यूसेसने सांडव्यावरून पाणी जात आहे. या धरणातून देहू, आळंदी, तळेगाव, तुळजापूरपर्यत पाणी जाते,अशी माहिती अभियंता अनंता हंडे यांनी दिली.