सरकारकडून रॅन्ड सारखे अत्याचार

By admin | Published: February 13, 2017 11:13 PM2017-02-13T23:13:31+5:302017-02-13T23:13:31+5:30

सरकारकडून रॅन्ड सारखे अत्याचार

Torture like rand from the government | सरकारकडून रॅन्ड सारखे अत्याचार

सरकारकडून रॅन्ड सारखे अत्याचार

Next

 पिंपरी :  लोक तुम्हाला घाबरतात; मग भयमुक्त सरकार कसले देणार? भ्रष्टाचार आणि काळा पैसा नोटाबंदीने काय साधले? तुमच्यासारख्या सामान्य माणसांकडे आहे का काळा पैसा? सामान्यांना वेठीस धरले. तासन्तास रांगेत उभे केले. देश चोरांचा आहे, असे भासवून सर्वांना कामाला लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात हवा गेली आहे. नोटाबंदीने दोनशेच्या वर बळी गेले. पुण्यात रँडने प्लेगचे कारण दाखवून घरात घुसून अत्याचार केले. तसेच अत्याचार आता सुरू आहेत. आम्ही हा हैदोस घालू देणार नाही, अशी घणाघाती टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदी निर्णयाचा समाचार घेतला.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी आकुर्डीतील खंडोबामाळावरील सभेत ठाकरे बोलत होते. सुमारे ५० मिनिटांच्या भाषणात त्यांनी भारतीय जनता पक्षाचा फोलपणा जनतेसमोर उघडा केला. नोटाबंदी निर्णयाचे परिणाम, राज्य सरकारचा कारभार, मुख्यमंत्र्यांची गाजराची शेती, शेतकरी कर्जमाफी, भाजपात गुंडांना मिळणारे प्रोत्साहन, शरद पवार यांचे पद््मविभूषण यावर जोरदार टीका केली. 

भाजपाचे राष्टÑवादीकरण यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, ‘‘मला लोक विचारतात, तुम्ही भाजपावर कशी काय टीका करता? राष्टÑवादी आणि काँग्रेसमधली अर्धी माणसे भाजपात गेली. ज्यांच्यावर आरोप करायचे त्यांच्यात काही दम राहिलेला नाही. म्हणून भाजपावर टीका करावी लागते. मध्यावधी निवडणुकांचे भाकीत केले आहे. भ्रष्टाचाराविरोधात बोलणाºया सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना पद्भूषण आणि ज्यांच्यावर भाजपाने निवडणुकीपूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना पद्विभूषण. कसा आहे हा कारभार? भ्रष्टाचाराचे आरोप करून निवडणुका जिंकल्या. आता निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी पुण्यात येऊन पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो, असे म्हणतात. पाहा हे गुरू-शिष्य. या एकाच नाण्याच्या नव्हे आता कॅशलेस व्यवहार होऊ लागल्याने एकाच कार्डच्या दोन बाजू आहेत. तुम्ही बोललेले विसराल. मात्र, लोक विसरणार नाहीत.’’

भाजपाचा सदस्य पाकिस्तानचा हेर

गुंडगिरीवर ठाकरे म्हणाले, ‘‘शिवसेनेत गुंड आहेत, असा आरोप भाजपा करते. माझ्या पक्षात गुंडापुडांना स्थान नाही. भाजपानेच इतर पक्षांतील गुंडांना स्थान दिले आहे. तमाम गुंड भाजपात जात आहेत, हे वास्तव आहे. आणि त्यांचे मंत्री वाल्ह्याचा वाल्मीकी असे समर्थन करीत आहेत. मध्यप्रदेशात भाजपाचा एक सदस्य पाकिस्तानचा हेर असल्याचे निष्पन्न झाले. मग पाहा कोण गुंडांना पोसतेय?’’ 

 

१) शेतकºयांना कर्जमुक्त करा, अशी शिवसेनेची मागणी आहे. शेतकºयांचे कर्ज माफ करीत असाल, तर आमचा तुम्हाला कायम पाठिंबा राहील.

२) चरखा म्हटल्यावर महात्मा गांधीजीच शोभून दिसतात. दोन वर्षांपूर्वीच हिंदुस्थान जन्माला आला आणि मोदींनी चरखा हाती घेतला, असे भासवीत आहेत. त्यांनी ना सत्याग्रह केला, ना फासावर गेले. चरख्यावरील गांधीजींचा फोटो काढला हे चुकीचे. भाजपा हा भ्रमाचा भोपळा आहे.

३) मोदींवर टीका का, असा प्रश्न विचारतात. मनपाच्या निवडणुकीत शहरभर मोदीचेच फ्लेक्स आहेत. विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीनंतर भाजपा मोदीशिवाय दुसरा चेहरा देऊ शकले नाहीत.

४) मिसकॉल दिला की भाजपाचा सदस्य. इंटरनॅशनल पक्ष आहे, आता परग्रहावरही सदस्य आहेत. निवडणूकांमध्ये भाजपा प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान आणि मुख् यमंत्री येतात. हे चुकीचे. एखाद्या पक्षाचा प्रचार कसा काय करू शकतात? हा खरा प्रश्न.

५) नोटाबंदीनंतर महिलांच्या बचतीकडे लक्ष देणार? असे भाजपाले म्हणाले. महिलांनी डब्यात काही बचत केली. हा काय चोरीचा, काळा पैसा आहे. कोणी जर डबे तपासायला आले तर डबे उघडून त्यात त्यांचे डोके बुडवा. रॅड सारखा अत्याचार सुरू आहे. याला स्वातंत्र्य म्हणायचे.

६) स्वतला कोणी देशाचे भाग्यविधाते समजत असेल तर ते चुकीचे आहे, हे मोहन भागवत यांची टीका मोदींना उद्देशून.

७) सर्जिकल स्टईक म्हणजे बागेला पाणी घालण्यासारखे आहे का? जवनांनी सर्जिकल स्टाईक केले शौर्य त्यांचे आणि फोटो काढून श्रेय घेतले भाजपाने. कोण गेले होते सर्जिकल स्टईक करायला. श्रेय घेता तसे अपश्रेय घ्या. 

८) पालकमंत्री गिरीश बापट खरे बोलले, देवेंद्र फडणीसांच्या काळांत ६५ हजार शेतकºयांना आत्महत्या केल्या. पारदर्शकतेची शपथ घेताना पालकमंत्री खरे बोलून गेले. 

९) हत्ती उधळायला लागला, सत्तांध झाला तर जनतेसाठी त्यांच्या डोक्यावर अंकुश मारायलाच हवा. 

१0) नितीमत्ता, विचारधारा असणारा भाजपाच्या व्यासपीठावर पूर्वी साधू-संत महंत असायचे आणि मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला गुंड पुंड बसतात. खंडण्या गोळा करून, खूनाचे गुन्हे असणाºयांना पक्षात घेऊन हे कसले भयमुक्त सरकार देणार. मंत्रालय गुंडालय करणार.

 

Web Title: Torture like rand from the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.