बहिणीच्या लग्नातील कर्ज फेडण्यासाठी पत्नीकडे माहेराहून पैसे आणण्याचा तगादा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 05:51 PM2019-06-03T17:51:15+5:302019-06-03T17:53:33+5:30
बहिणीच्या लग्नामध्ये झालेल्या कर्जाचे पैसे देण्यासाठी व मोटार विकत घेण्यासाठी पत्नीने तिच्या वडिलांकडून पैसे आणावेत, यासाठी पत्नीला त्रास दिला...
पिंपरी : बहिणीच्या लग्नात झालेले कर्ज फेडण्यासाठी तसेच मोटार घेण्यासाठी पत्नीकडे माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती मिनिनाथ बबन डोरले व सासरा बबन श्रीपती डोरले (दोघेही रा. श्रीपती निवास, जय शिवशंकर हौसिंग सोसायटी, म्हेत्रेवस्ती, चिखली) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २७ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लग्नानंतर मिननाथ याने पत्नीला वेळोवेळी विनाकारण मारहाण केली. तसेच त्याच्या बहिणीच्या लग्नामध्ये झालेल्या कर्जाचे पैसे देण्यासाठी व मोटार विकत घेण्यासाठी पत्नीने तिच्या वडिलांकडून पैसे आणावेत, यासाठी पत्नीला त्रास दिला. दरम्यान, सासऱ्याने देखील किरकोळ कारणावरुन सूनेला शिवीगाळ करुन घरातून हाकलून दिले होते. या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.