विसापुर किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांची चार तासाने सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 03:34 PM2019-07-19T15:34:45+5:302019-07-19T15:36:20+5:30

तळेगाव जनरल हॉस्पिटल येथील शिकाऊ डॉक्टरांपैकी आठ ते दहा जण सोमवारी विसापुर किल्ला परिसरात ट्रेकला आले होते.

Tourists stuck on the fort of Visapur, were rescued safely for four hours | विसापुर किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांची चार तासाने सुखरुप सुटका

विसापुर किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकांची चार तासाने सुखरुप सुटका

googlenewsNext

लोणावळा : विसापुर किल्ल्यावर ट्रेकसाठी गेल्यानंतर अपुर्‍या माहितीमुळे रस्ता भरकट जंगलात अवघड ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांची चार तासांच्या पराकाष्ठेनंतर सुखरुप सुटका करण्यात आली.
    तळेगाव जनरल हॉस्पिटल येथील शिकाऊ डॉक्टरांपैकी आठ ते दहा जण सोमवारी विसापुर किल्ला परिसरात ट्रेकला आले होते. सोमवारी (दि.15) रोजी सकाळी ते विसापुर किल्ल्यावर चढाई करत असताना अमर कोरे हा रस्ता भरकटल्याने जंगलात अवघड ठिकाणी अडकला. त्याठिकाणाहून त्याला खाली उतरणे अथवा वर चढाई करणे शक्य नव्हते. यावेळी कौशिक पाटील या त्यांच्या मित्राने लोणावळ्यातील शिवदुर्गच्या टिमला लोकेशन पाठवत मदतीकरिता पाचारण केले. यावेळी शिवदुर्गचा कार्यकर्ता सागर कुंभार हा भाजे लेणी परिसरातच होता. त्यांने तत्परता दाखवत घटनास्थळाकडे दाखल होते अमरला धीर देत टिम व साहित्य मागावून घेतले. अर्धा ते पाऊण तासात लोहगड मार्गे टीम गाय खिंडीत दाखल झाली. किल्ल्यापर्यत गाडी जाणे शक्य नसल्याने पायी प्रवास करत टीम किल्ल्याजवळ पोहचली. दुपारी दोनच्या सुमारास रेस्कू कार्य सुरु करत सायंकाळी साडेचार वाजता विकास मावकर या शिवदुर्गच्या शिलेदाराने सागरच्या मदतीने अमरला सुखरुप बाहेर काढण्यात आले. साडेचार तास अमर हा एका दगडाला धरुन थांबला होता.रेस्क्यू  सुरु असताना पावसाने रुद्र रुप धारण केले होते, त्यावर मात्र करत शिवदुर्गने रेस्क्यू मोहीम यशस्वीपणे पार पाडले.
   विकास मावकर, सागर कुंभार, सागर बाळकुंद्री, पवन म्हाळसकर, दत्ता तनपुरे, रोहित नगिने, हेमंत वाघमारे, निलेश निकाळजे, अनिल आंद्रे, वैष्णवी भांगरे, निकेत तेलंगे,अमित भदोरीया, दिनेश पवार, आनंद गावडे, सुनिल गायकवाड ह्या टिमने सदरचे रेस्कू आँपरेशन पुर्ण केले.

Web Title: Tourists stuck on the fort of Visapur, were rescued safely for four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.