‘स्मार्ट सिटी’तही जोपासली जातेय पारंपरिक शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:15 AM2018-07-25T01:15:48+5:302018-07-25T01:16:14+5:30
चिखली, चऱ्होली भागामध्ये भात लावणीची लगबग सुरू; मजुरांना वाढली मागणी
मोशी : गेल्या आठवडाभरापासून पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसाने भात खाचरे भरली असून, भात लावणीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने मोशी परिसरात भात लावणीची लगबग सुरू झाली असून, भाताची आवणी जवळजवळ अंतिम टप्प्यात आली आहे.
असाच पाऊस चालू राहिल्यास भातलागवड शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडणार असून, भरघोस पीक येण्याची अपेक्षा आहे. मोशी पंचक्रोशीतील चºहोली, चिखली, डुडुळगाव, चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे, मोशीतील जांभूळ शेत, सस्ते वाडी, आल्हाट वाडी, बोºहाडे वाडी, देहू रस्ता आदी भागांमध्ये भातलागवड केली जाते. मोशी, पिंपरी-चिंचवड शहराचे महत्त्वाचे उपनगर असून, या भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहत आहेत. यामुळे शेती नावालाच शिल्लक राहिली असल्याची खंत व्यक्त होत आहे. तसेच या आवणीसाठी मात्र मोठ्या प्रमाणात मजूर टंचाई भासत असून, कुशल मजूर नसल्याने भातलागवड करणाºया शेतकºयांची निराशा होत असून, भातलागवडी खालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे. यामुळे शेतकºयांना भातलागवडीसाठी परप्रांतीय मजुरांचा आधार घ्यावा लागत आहे.