मोकाट जनावरांमुळे वाहतूककोंडी

By admin | Published: January 10, 2017 03:14 AM2017-01-10T03:14:18+5:302017-01-10T03:14:18+5:30

अरुंद रस्ते आणि चौक, रस्त्याच्या दूतर्फा दुचाकी आणि रिक्षांनी फुटपाथवर केलेले अतिक्रमण व मोकाट जनावरांनी व्यापलेला रस्ता

Traffic animals due to slaughter animals | मोकाट जनावरांमुळे वाहतूककोंडी

मोकाट जनावरांमुळे वाहतूककोंडी

Next

काळेवाडी : अरुंद रस्ते आणि चौक, रस्त्याच्या दूतर्फा दुचाकी आणि रिक्षांनी फुटपाथवर केलेले अतिक्रमण व मोकाट जनावरांनी व्यापलेला रस्ता अशी परिस्थिती पिंपरीतील डीलक्स चौक ते शगुन चौकापर्यंत दररोज पहायला मिळत आहे.
येथील पिंपरी-काळेवाडी मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरून दररोजच होणाऱ्या वाहतूककोंडीचा पादचारी ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व
दुचाकी वाहनचालकांना सामना करावा लागत असून, मोठी कसरत करीत या रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत आहे. या रस्त्यावरून दररोज सकाळी सात ते अकरा व सायंकाळी चार ते नऊ वाजेपर्यंत वाहनांची व नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. याच काळात रस्त्यावरील मोकाट जनावरे व रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतपणे लावलेल्या रिक्षा व दुचाकींचीही मोठी रीघ असते. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांना या गर्दीतून रस्ता काढणे मोठे जिकीरीचे होत आहे. तसेच जवळच चौकात वाहतूक पोलीस असूनही या मोकाट जनावरांच्या व अनधिकृत उभ्या केलेल्या रिक्षामुळे होणाऱ्या वाहतूककोंडीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. तरी या रस्त्यावर नेहमीच होणाऱ्या वाहतूककोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिक्षावाले व दुचाकी पार्क करणाऱ्या नागरिकांनी स्वत:नेच शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच मोकाट फिरणाऱ्या जनावरांचाही बंदोबस्त करून वाहतूक सुरळीत करण्यास पोलिसांनी प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.(वार्ताहर)

Web Title: Traffic animals due to slaughter animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.